Home
Home चंद्रपूर चंद्रपुरात ‘मनसे’चा यशस्वी एल्गार! नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! दारू दुकानाच्या स्थलांतरासाठी मनसेचा जनआक्रोश...

चंद्रपुरात ‘मनसे’चा यशस्वी एल्गार! नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! दारू दुकानाच्या स्थलांतरासाठी मनसेचा जनआक्रोश आंदोलन!

0
267

HELLO CHANDA NEWS

      चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर शहरातील वाईन शॉप (दारू दुकान) स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता रस्त्यावर उतरल्याने सामान्य नागरिकांनी सुद्धा या जनआक्रोश आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, हे मात्र विशेष!

          मनसे चे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य असे जनआक्रोश आंदोलन राज्य उत्पादन शुल्क कार्यालय चंद्रपूर समोर करण्यात आले या आंदोलनात महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

  चंद्रपूर शहरातील वाढती दारूची दुकाने आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, मनसेनी प्रशासनाकडे ही मागणी केली आहे.

  शहरातील विशिष्ट भागातील वाईन शॉपचे स्थलांतर तातडीने करावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

       राज्य उत्पादन शुल्क कार्न करण्यात आला असून मनसेचे जिल्हाध्यक्ष
मनदीप रोडे म्हणाले की, “हे आंदोलन केवळ राजकीय नसून जनहिताच्या प्रश्नावर आहे. दारूच्या दुकानांमुळे परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल.

       या आंदोलनात मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक महिला, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या सहभाग नोंदविल्याने हा आंदोलन यशस्वी ठरणार व मनसेची मागणी मान्य होणार अशी चर्चा शहरात सुरू आहे, हे मात्र विशेष!

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here