Home चंद्रपूर कमल स्पोर्टींग क्लबचा स्तुत्य उपक्रम..! महाशिवरात्री निमित्त भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : महाशिवरात्रीच्या पवित्र, पावन सणानिमित्त प्रदेश भाजयुमोचे युवा नेते तथा कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर सन 2016 पासून सातत्याने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करीत असून यंदाही महाशिवरात्री निमित्त दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी अंचलेश्वर गेटजवळील श्री अंचलेश्वर मंदिर परिसरात भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
सकाळी 06.00 वाजता श्री अंचलेश्वर मंदिरात शिवलिंगाचे पुजन करून उपस्थित भाविकांना प्रसाद वितरीत करण्यात आले. पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते शिवभक्तांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा नेते खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, पुनम तिवारी, सरीता घटे, गौतम यादव, सुभाष आदमने, सलीम शेख मामु, राजेश वाकोडे, कमल कजलीवाले, मयुर भोकरे, स्वप्निल मुन, राहुल गायकवाड, आशय चंदनखेडे, ललीत गुलानी, जगदीश दंडेले, संतोष दिकोंडवार, प्रविण चुनारकर व कमल स्पोर्टींग क्लबचे सहकारी उपस्थित होते.
या साबुदाणा खिचडीचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. 


*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*