Home चंद्रपूर विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू भांडी घासत असताना.
HELLO CHANDA NEWS
पोंभुर्णा,(वि. प्र.) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी.१७ दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सुफल सुनील वनकर, वय २९, रा. पोंभुर्णा, असे मृत महिलेचे नाव आहे.
सूफल वनकर या घराच्या समोरील लोखंडी शेडमध्ये भांडी घासत होत्या. विद्युत पुरवठा करणारे वायर कटून असल्याने लोखंडी शेडला विद्युत करंट होते. याबाबत कोणतीही माहिती नसल्याने महिलेचा स्पर्श लोखंडी शेडला झाला.
यात तिला विद्युतचा तीव्र झटका लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
घरी कुणीच नसल्याने घटनेची तत्काळ माहिती मिळाली नाही. दरम्यान, आरडीचे पैसे घेणारा एजंट आल्याने घटना उघड झाली. लगेच स्थानिक वॉर्डवासीयांनी तातडीने धाव घेतली.
सुफल ला पती व मुलगा मुलगी होते असा चार लोकांचा परिवार होता सूफल सुनील वनकर यांचे नवीन घरराचे बांधकाम सुरु असल्याने तें शेजारी किरायानी राहत होते.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*