नागभीड,(वि. प्र.) : येथे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवरथ मिरवणूक निघते. या मिरवणुकीस ३०० वर्षांची परंपरा आहे. नागभीड येथील कामुनवार परिवार या मिरवणुकीचे नियोजन करीत आले आहे. शिरस्त्याप्रमाणे रविवारी रात्री ही मिरवणूक निघाली.
नागभीडच्या पश्चिमेच्या टेकडीवर
शिवमंदिरात शिवलिंग स्वयंभू असून या दर्शनासाठी भाविक वर्षभर गर्दी करतात महाशिवरात्रीला शिवटेकडीच्या पायथ्याशी परंपरेने यात्रा भरते. आता तर या यात्रेला महोत्सवाचे स्वरूप आले आहे.
शिवरात्रीच्या दिवशी रथावर विराजमान शिवजींची विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर कामुनवार यांच्या घरून या ढोल, ताशाच्या निनादात गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढली.
हा रथ ३०० वर्षाची परंपरा असलेला महाशिवरात्रीचा हा उपक्रम आता कामुनवार परिवारातील राहुल आणि रंजन हे दोघे भाऊ चालवित आहेत. परिसरातील नागरिक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते.
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*