Home
Home चंद्रपूर साकार होत असलेल्या अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक अस्मितेला नवी दिशा मिळेल –...

साकार होत असलेल्या अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक अस्मितेला नवी दिशा मिळेल – आ. किशोर जोरगेवार. शिवजयंती निमित्त पुतळ्याच्या प्रतिकृतीवर पुष्पावर्षाव.

0
167

HELLO CHANDA NEWS

                 चंद्रपूर,(का. प्र.) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती आज येथे ठेवण्यात आली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

    साकार होत असलेल्या अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक अस्मितेला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

        शिवजयंती निमित्त श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची प्रतिकृती शिवप्रेमींसाठी दर्शनार्थ ठेवण्यात आली होती. या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

               यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ओबीसी नेते अशोक जीवतोडे, मनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, भाजप नेते प्रकाश देवतळे, तुषार सोम, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, महामंत्री रवी गुरनुले, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, स्वप्निल डुकरे, सायली येरणे, विमलताई कातकर, प्रलय म्हसाखेत्री, रामकुमार आकापल्लीवार, दिनकर सोमलकर, नगरसेविका सारिका संदुरकर, पुष्पा उराडे, शीतल गुरनुले, जितेश कुळमेथे, नितेश गवळे, आशा देशमुख, रॉबिन विश्वास, ज्योती जीवने, आशिष मासीरकर, गणेश पिंपळकर, कौसर खान, सुधीर कारंगल, सुजाता कापसे, अस्मिता तावडे, कल्पना शिंदे, सुमित बेले, चंद्रशेखर देशमुख, राजेश मोरपाका, राकेश नाकाडे, ईश्वर विरुटकर, तपोश डे, शशिकांत मस्के, अभिनय कोरकोपलवार, अलका मेश्राम, हेमलता खोब्रागडे, रीना साखरकर, सोनाली आंबेकर, रेशमा पांडे, रेणुका येरणे, भाग्यश्री येरणे, छाया चवरे आदींची उपस्थिती होती.

                 यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, या चौकात उभारला जाणारा महाराजांचा अश्वारूढ पुतळा तब्बल १२ फूट उंच असणार आहे, तर त्यामागील भव्य किल्ल्याची उंची २७ फूट असेल. हा पुतळा केवळ एक शिल्प नसून तो आपल्या इतिहासाची, परंपरेची आणि अस्मितेची सजीव ओळख ठरेल. चंद्रपूर शहराच्या मध्यभागी उभा राहणारे हे स्मारक पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा दीपस्तंभ ठरेल.

             हा भव्य पुतळा कला संस्कार आर्ट स्टुडीओ, पुणे येथे अत्यंत कुशल शिल्पकारांकडून साकारल्या जात आहे. प्रत्येक बारकावा आणि रेखीव तपशील महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाला साजेसा असेल, याची विशेष काळजी घेतली जात आहे.

आज शिवजयंती निमित्त मी या प्रतिकृतीवर पुष्पावर्षाव करून महाराजांना विनम्र अभिवादन केले. मात्र हे केवळ अभिवादन नसून त्यांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या तत्त्वांचा आपल्या जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प आहे. महाराजांनी दिलेला स्वाभिमान, न्याय, सुशासन आणि लोककल्याणाचा आदर्श आपण आचरणात आणणे हीच खरी मानवंदना ठरेल.

  चंद्रपूर शहराच्या विकासासोबतच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. हा पुतळा शहराची ओळख ठरेल, पर्यटनाला चालना देईल आणि तरुण पिढीला इतिहासाशी जोडून ठेवेल, असेही ते म्हणाले.

          यावेळी स्वरा संदुरकर यांनी शिवगर्जना सादर केली, तर धनश्री ईटनकर आणि ऋत्विक साखरकर या चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातोश्री यांची वेशभूषा परिधान केली होती.

      कार्यक्रमाच्या शेवटी आ. किशोर जोरगेवार यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here