Home
Home चंद्रपूर गोंडवाना विद्यापीठस्तरिय नेटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय विजयी.

गोंडवाना विद्यापीठस्तरिय नेटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय विजयी.

0
118

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर,(का. प्र.) : गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलींच्या नेटबॉल स्पर्धेत येथील सरदार पटेल महाविद्यालयाने सुवर्ण पदक तर मुलांच्या संघाने रौप्य पदक पटकाविले आहे.

                गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धा विसापूर येथील राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.

         स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला.

    या नेटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. विजेतेपद खेचून आणण्याकरिता मुलींच्या संघात स्नेहा गाणफाडे, मोनिका गराड, मयूरी अलाम, दिपाली शेंडे, क्षितिजा कांबडे, आरती बारसागडे, वैष्णवी देशमुख, सुप्रिया बांबोळे, सलगम गुप्ता, तनुजा कुमरे, पूजा केवट, संजना कैथल आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.

                         तसेच मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. उपविजेतेपद खेचून आणण्याकरिता संघात रोहित उमाटे, तमस कुंभारे, साहिल गुडपल्लीवर, आशीष जाधव, आदित्य मंगरुळकर, सचिन राऊत, सूरज भगाडे, भूषण पेकाडे, रोहित पवार, वेदांत विधाते, दीपक कडूकर, प्रतीक राणे यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.

   दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेडीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, हनुमंत डभारे, आदित्य मंगरूळकर, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here