Home चंद्रपूर आझाद गार्डन चंद्रपूर येथे न्यू आझाद गोल्डन योगनृत्य ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी...
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : न्यू आझाद गोल्डन योगनृत्य ग्रुप तर्फे आझाद गार्डन चंद्रपूर येथे रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला ग्रुप च्या जेष्ठ सदस्या उदासी काकू,.
यांनी मालर्पण केले. यानंतर सोनाली आंबेकर यांनी शिवगर्जना म्हणून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
यानंतर ग्रुप चे सदस्य प्रकाश गुंटेवार, रामेश्वर पातसे, चंद्रकांत बोरीकर, अनिल शृंगारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनकार्यावर आणि त्यांचा शौर्यावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात सोनाली आंबेकर यांनी एकपात्री प्रयोगात माँ जिजाऊ ची भूमिका साकारून महिलांना त्यांचा कार्याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन ग्रुप च्या सदस्या आणि प्रशिक्षक संगीता कामडी यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय तावाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रुप च्या बहुसंख्य सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी ग्रुप सदस्य अमोल चांदेकर यांच्या तर्फे सर्वांना नास्ता देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*