Home चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिकेच्या कंत्राटी अभियंत्याला 1.30 लाखांची लाच घेताना अटक.
चंद्रपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या… बाबी तपासून सापळा रचण्यात आला.
शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अब्दुल रसीद अब्दुल हमीद यांच्याकडून.
चंद्रपूर,(वि.प्र.) : शहर महानगरपालिकेतील कंत्राटी अभियंता शुभम वरघट याने एका व्यावसायिकाकडून सुमारे १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.
या कारवाईमुळे महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
शुभम वरघट याची चंद्रपूर महानगरपालिकेत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कंत्राटी अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील ७ वर्षांपासून तो काम करीत आहे. अशा प्रकारे सात वर्षांमध्ये किती लोकांनाची फसवणूक केली असेल लाच खोर शुभम वरघर्ट यालाच माहित कंत्राटी अभियंता असतानासुद्धा त्याच्याकडे नगररचना विभागातील काम देण्यात आले होते. शहरातील अतिक्रमण आणि अवैध बांधकाम तपासणीचे काम शुभम वरघट करीत होता. एकोरी प्रभागातील रहिवासी अब्दुल रसीद अब्दूल हमीद यांनी राजस्थान सोप फॅक्टरीजवळ
आरोपी शुभम वरघट
गोडावूनचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम अवैध असल्याची तक्रार महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने मोका
चौकशी झाली. बांधकाम अवैध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर बांधकाम पाडण्यात यावे, अशी नोटीस महानगरपालिकेकडून अब्दुल रसीद अब्दुल हमीद यांना देण्यात आली होती. दरम्यान, बांधकाम जैसे थे ठेवून कारवाई टाळता येईल म्हणून शुभम वरघट याने अब्दुल रसीद अब्दुल हमीद यांच्याकडे सुमारे ३ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी सुरुवातीला १ लाख ३० हजारांची रक्कम देण्याचे ठरले होते.
याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आल्यानंतर सर्व
१ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना शुभम वरघट याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. वरघट हा मूळचा अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथील रहिवासी आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत कंत्राटी अभियंता म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गांधी चौक परिसरातच तो वास्तव्यास आहे. काँग्रेसच्या नगरसेविका महानंदा वाळके यांचा तो होणारा जावई आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार यांच्या पथकाने केली. या कारवाईनंतर वरघट याची एसीबीच्या कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे.
इतकी मोठी रक्कम लाचेत मागितल्याने यात आणखी काही अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत काय, याचीही चौकशी केली जात आहे. या कारवाईमुळे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत चांगलीच खळबळ माजली आहे.
चंद्रपुर शहरतील जनतेची मांगनी अशा लांच खोर अभियंत्याला महानगर पालिका प्रशासनाने नौकरीतुन निलंबित करावे. जेनेकरुण दूसरा चंद्रपुर महापालिकेतील अधिकारी लांच घेणार नाही हीच चंद्रपुर शहरतील जनतेची मांगनी आहे.



*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*