Home
Home चंद्रपूर माणुसकी जपणारे जयदीप रोडे यांचे अनेक स्तरावरून कौतुक!

माणुसकी जपणारे जयदीप रोडे यांचे अनेक स्तरावरून कौतुक!

0
193

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर(का.प्र.): समाजसेवेबद्दल अनेक लोक चर्चा करतात परंतु कथनी प्रमाणे करणी असे कार्य करणारे फार कमी असतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे याचे अनुकरण करत जयदीप रोडे यांनी माणुसकीचा धर्म जपला अशी चर्चा संपूर्ण शहरात होत असून अनेक स्तरावरून त्यांच्या या निस्वार्थ कार्याचे कौतुक केले जात आहे, हे मात्र विशेष!

      सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर येथे पोलिस भरती मुलाकात परीक्षा साठी आलेले उमेदवारांकरिता जयदीप रोडे यांनी शहरात अनेक ठिकाणी फलक लावून जाहीर रित्या आपल्या शिवगड कार्यालयात राहण्याची, जेवणाची,मेडिकल कॅम्पची सुविधा निःशुल्क करण्यात आल्याचे आवाहन केले.

त्यामुळे बाहेरून आलेल्या उमेदवारांना आधार दिलासा मिळाला आहे असे म्हणता येईल दिनांक १० फेब्रुवारी पासून त्यांनी ही उपरोक्त सुविधा आलेले उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली असून आजपर्यंत ३५०० उमेदवारांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे व आता तर मुलींसाठी त्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली असून ३० मुलींना देखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्या या समाजकार्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात पसरली असून नेता होने वेगळे व निस्वार्थपणे समाजकार्य करून आपले नाव आपले स्थान लोकांच्या मनात कायम करणे वेगळे असे म्हणत बुद्धिजीवी वर्गात लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणारे जयदीप रोडे यांचे कौतुक केले जात आहे, हे मात्र विशेष!

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here