Home
Home चंद्रपूर पोंबून्यातील नगरपंचायत बिनविरोध सभापतींच्या निवडीने नगर विकासाला नवीन गती मिळण्याची शक्यता. नवनियुक्त...

पोंबून्यातील नगरपंचायत बिनविरोध सभापतींच्या निवडीने नगर विकासाला नवीन गती मिळण्याची शक्यता. नवनियुक्त सभापतींचे राज्याचे माजी वने व संस्कृतिक कार्यमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन.

0
163

HELLO CHANDA NEWS

       

       पोंभुर्णा,(वि. प्र.) : पोंभुर्णा नगरपंचायत सभागृहात विविध समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली असून सर्व पदांवर बिनविरोध निवड होऊन नगरविकासाला नवी दिशा मिळाली आहे.

          याबद्दल नवनियुक्त सभापतींचे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहे.          

    आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी दर्शन गजानन गोरंटीवार, शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा समितीच्या सभापतीपदी लक्ष्मण उद्धव कोडापे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. नंदा ऋषी कोटरंगे तर उपसभापतीपदी सौ. उषा सदाशिव गोरंतवार यांची निवड करण्यात आली.

  या निवडणुकीत सर्व समिती सदस्य पदांसाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे सर्व निवड बिनविरोध पार पडले. नवनियुक्त सभापतींचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक करून अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

   त्यांनी पोंभुर्णा नगरपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

          यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, संघटन प्रभारी राम लाखिया, भाजपा तालुका अध्यक्ष हरीश ढवस, राहुल संतोषवार, ऋषी कोटरंगे, ईश्वर नैताम, गुरुदास पिपरे, मोहन चलाख, राजू ठाकरे तसेच नगरसेविका श्र्वेता वनकर, आकाशी गेडाम, रोहिणीताई ढोले, शारदाताई गुरनुले आणि नगरसेवक महेश रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here