Home
Home चंद्रपूर भाजपा महानगर चंद्रपूर च्या झूम मीटिंग मध्ये जनसंपर्क वाढवून बूथ पातळीवर संघटन...

भाजपा महानगर चंद्रपूर च्या झूम मीटिंग मध्ये जनसंपर्क वाढवून बूथ पातळीवर संघटन मजबूत व गतिमान करण्याचं आमदार किशोर जोरगेवारांचा संदेश अन निर्धार.

0
106

HELLO CHANDA NEWS

    चंद्रपूर,(का. प्र.) : भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने आयोजित झूम मीटिंगमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनी आभासी पद्धतीने सहभागी होत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

    या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

         बैठकीत बूथ रचना सक्षम करणे, जनसंपर्क अधिक प्रभावी करणे तसेच “अम्मा की पढाई” आणि “अम्मा का टिफिन” यांसारख्या सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्याबाबत विचारमंथन झाले.

             त्याचबरोबर महाप्रशिक्षण अभ्यासवर्ग व महा आरोग्य शिबिर यांसारख्या उपक्रमांद्वारे समाजाशी अधिक घट्ट नाते निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

   यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, कोणत्याही निवडणुकीत विजयाचा पाया हा बूथ पातळीवरच रचला जातो.

      म्हणूनच बूथ रचना अधिक सक्षम आणि सुबक करणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. प्रत्येक बूथवर सक्रिय कार्यकर्ते, मतदारांशी सतत संपर्क आणि त्यांच्या अडचणींची नोंद — हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आपण जनसंपर्क अधिक प्रभावी केला, तर मतदारांचा विश्वास आपोआप आपल्या पाठीशी उभा राहील.

    आपण फक्त राजकारण करत नाही, तर समाजकारणाची जबाबदारीही पार पाडत आहोत. “अम्मा की पढाई” आणि “अम्मा का टिफिन” यांसारखे उपक्रम हे केवळ योजना नाहीत, तर समाजातील दुर्बल घटकांना उभारी देणारे संवेदनशील प्रयत्न आहेत. महाप्रशिक्षण अभ्यासवर्ग आणि महा आरोग्य शिबिर यांच्या माध्यमातून आपण समाजाशी थेट संवाद साधत आहोत.

हे उपक्रम प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक परिसरात पोहोचले पाहिजेत.

            नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे आपण सखोल विश्लेषण केले पाहिजे. जिथे आपण कमी पडलो, तिथे सुधारणा केली पाहिजे आणि जिथे आपली ताकद आहे, तिला अधिक बळ दिले पाहिजे.

      मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घ्या. त्यांच्या घरापर्यंत पोहोचा.

     त्यांचे प्रश्न ऐका. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या. पक्ष नेतृत्वाचे विचार आणि सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा.

     महानगर चंद्रपूरमध्ये संघटना अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि गतिमान करण्याचा निर्धार या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला.

         या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here