Home
Home चंद्रपूर पत्रकारावर जीवघेणा हल्ला.

पत्रकारावर जीवघेणा हल्ला.

0
187

HELLO CHANDA NEWS

  चंद्रपूर,(वि. प्र.) : अतिक्रमणाबाबत तक्रार केल्याचा राग मनात धरून होळीच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकारावर घरात घुसून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरात उघडकीस आली आहे.

     दैनिक नवराष्ट्र निर्माण चे जिल्हा विशेष प्रतिनिधी योगेश मुऱ्हेकर

 यांच्यावर चार ते पाच जणांनी नशेत असताना अचानक हल्ला केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, योगेश मुऱ्हेकर

हे आपल्या घरी कुटुंबीयांसोबत असताना हल्लेखोरांनी थेट घरात घुसून त्यांच्यावर धावून जाऊन मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुऱ्हेकर काही क्षण स्तब्ध झाले; मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत आपल्या परिवाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला.

         या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “आता प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार सुद्धा सुरक्षित नाहीत का?” असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल

   या घटनेप्रकरणी योगेश मुऱ्हेकर यांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधितांवर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

अतिक्रमण तक्रारीचा राग?

        चार महिन्यांपूर्वी मुऱ्हेकर यांनी म्हाडाच्या जागेवर एका मटण दुकानदाराकडून करण्यात आलेल्या कथित अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती.

      या तक्रारीचा राग मनात ठेवून संबंधित मटण शॉपच्या मालकाने मुद्दाम भांडण उकरून काढल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दुकानातील किरकोळ वाद वाढवत तो थेट घरापर्यंत नेण्यात आला आणि बाहेरून काही तरुणांना बोलावून हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल.

या घटनेप्रकरणी योगेश मुऱ्हेकर यांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधितांवर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

पत्रकार संघटनांचा निषेध.

पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा विविध पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईची मागणी होत असून, दोषींवर तात्काळ अटक करून कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.

ही घटना केवळ एका पत्रकारावरचा हल्ला नसून, सत्य मांडणाऱ्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न.

अशाच प्रकारे बाबुपेठ हिंगलाज भवानी वार्ड येतील राहणारे पत्रकार विनोद दुर्गे यांच्या घरी जाऊन  परिवारावर  हमला झाला होता.  अजूनही त्या पत्रकाराला न्याय मिडाला नाही न्यायाच्या प्रतीक्षेत.

असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने आणि निष्पक्ष कारवाई करून पत्रकारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here