Home
Home चंद्रपूर सावित्राबाई फुले योजनेचा लाभ,लग्नमंडपात दिला.

सावित्राबाई फुले योजनेचा लाभ,लग्नमंडपात दिला.

0
124

HELLO CHANDA NEWS

  बल्लारपूर,(वि. प्र.) : बहुजन हिताय ऑटो चालक-मालक सहकारी संस्था. चंद्रपूरच्या वतीने बल्लारपूर येथील संस्थेचे सदस्य उदयभान अयोध्याप्रसाद विश्वकर्मा यांच्या मुलीच्या विवाहास १० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत करण्यात आली.

  उदयभान विश्वकर्मा हे मागील सहा वर्षांपासून संस्थेचे सदस्य असल्याने त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या विवाह योजनेचा लाभ देण्यात आला.

   संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हुमने यांनी आपल्या संचालक मंडळासह प्रत्यक्ष लग्न मंडपात जाऊन मदतीचा हात दिला.

 याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष कुंदन रायपुरे, संचालक विलास जुमळे, विजय एकोणकर, विठ्ठल बट्टाले, किरणकुमार

   पुणेकर, रवी दुर्योधन, सुनीता गावंडे, तालुका अध्यक्ष प्रमोद शेंडे, कार्याध्यक्ष संजू वर्मा, लहुजी भगत, काशिनाथ आत्राम, बंडूजी गोरघाटे, शेख खलिफ, कमल नगराडे, अरविंद कामतकर, दिलीप मराठे, प्रमोद खाडगे, शेख अल्ताफ, शेख मोहीन, रामअवतार वर्मा आदी उपस्थित होते.

        संस्थेच्या या मदतीमुळे उदयभान विश्वकर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेष, प्रतिनिधी, विनोद दुर्गे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here