Home
Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा पाणंद रस्त्यांची 100 टक्के पूर्तता करणारा पहिला जिल्हा ठरावा..! आ....

चंद्रपूर जिल्हा पाणंद रस्त्यांची 100 टक्के पूर्तता करणारा पहिला जिल्हा ठरावा..! आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले उद्दिष्. तीन वर्षांच्या आत मतदारसंघातील सर्व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आ. मुनगंटीवार यांनी दिले निर्देश. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठक.

0
110

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर,(का. प्र.) – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा पाणंद रस्त्यांची 100 टक्के पूर्तता करणारा पहिला जिल्हा ठरावा, यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत जनसंपर्क कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

त्यावेळी ते बोलत होते.

                       आ. मुनगंटीवार यांनी नियोजनबद्ध काम करून पुढील तीन वर्षांच्या आत मतदारसंघातील सर्व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देशही उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

      या बैठकीला संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

आ. मुनगंटीवार यांनी पाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. कोणती कामे झाली आहेत, कोणती प्रलंबित आहेत यासंदर्भात माहिती घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांना पुढील तीन वर्षांचे उद्दिष्ट दिले.

  हे काम करताना पाणंद रस्त्यांच्या कामांचे नियोजन, प्रगती व देखरेख सुलभ व्हावी म्हणून स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्याचे तसेच पाणंद रस्त्यांच्या बांधकामासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी दिले.

  याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान (टप्पा 1) अंतर्गत सर्वसामान्य व गोरगरीब  नागरिकांच्या विविध समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचनादेखील आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत तसेच हे अभियान प्रभावीपणे राबवून यशस्वी करावे, असे निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी दिले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here