Home
Home चंद्रपूर सरदार पटेल महाविद्यालयात संशोधन केंद्राची कार्यशाळा.. बौद्धिक संपदा हक्क संशोधनातील अत्यंत...

सरदार पटेल महाविद्यालयात संशोधन केंद्राची कार्यशाळा.. बौद्धिक संपदा हक्क संशोधनातील अत्यंत महत्वाचा घटक -कुमार राजु..

0
74

HELLO CHANDA NEWS

             चंद्रपूर,(का. प्र.) – बौद्धिक संपदा हक्क हे संशोधकांना त्यांच्या नवकल्पनांचे संरक्षण आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देतात.

       त्यामुळे संशोधकांना पेटंट, कॉपीराइटद्वारे त्यांच्या शोधांना कायदेशीर संरक्षण मिळते. परिणामी बौद्धिक संपदा हक्क हा संशोधनातील अत्यंत महत्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन ‘आरजीएनआयआयपीएम’ चे पेटंट व डिजाइनचे सहाय्यक नियंत्रक कुमार राजु यांनी येथे बोलताना केले.

                         येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग, रिसर्च अँड स्पेशलाइज स्टडीज’ (संशोधन केंद्र) च्या वतीने व राजीव गांधी राष्ट्रीय बौध्दिक संपदा व्यवस्थापन संस्था (आरजीएनआयआयपीएम) नागपूर, भारत सरकार यांच्या सहकार्याने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

  त्यावेळी संशोधक,अभ्यासकांशी आभासी पद्धतीने संवाद साधताना ते बोलत होते.

                    या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग, रिसर्च अँड स्पेशलाइज स्टडीज’चे प्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी केले.

  यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, संशोधन केंद्र समन्वयक डॉ. रक्षा पी. धनकर प्रामुख्याने उपस्थित होते.

           भारतात बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) हे आविष्कार, डिझाईन आणि इतर सर्जनशील कामांना संरक्षण देतात, ज्यात पेटंट आणि डिझाईन नोंदणी महत्त्वाची आहे.

  त्याचे प्रकार, प्रक्रिया, फायदे, शुल्क पद्धती यावर नेमक्या, सोप्या शब्दात कुमार राजु यांनी ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’च्या माध्यमातून प्रभावीपणे मार्गदर्शन केले.

        बौद्धिक संपदा हक्क हा घटक संशोधन करणाऱ्या विद्यार्थी, अभ्यासकांसाठी महत्त्वाचा असून ही कार्यशाळा त्यांच्यासाठी फलदायी ठरेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य पी.एम. काटकर यांनी यावेळी व्यक्त केला.

   कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना सदर कार्यशाळेमागील भूमिका डॉ. रक्षा पी. धनकर यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन रिता टेकाडे यांनी, तर  आभार प्रदर्शन अर्चना माटे यांनी केले.

 या कार्यशाळेत सुमारे १२० प्राध्यापक, शिक्षक, पदव्युत्तर विद्यार्थी व संशोधक सहभागी झाले होते.

      दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here