Home
Home चंद्रपूर एस. बी. किशोर यांचा AI आधारित “Practical व Viva Generator” विकसित.

एस. बी. किशोर यांचा AI आधारित “Practical व Viva Generator” विकसित.

0
166

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर,(का. प्र.) : सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील संगणक विज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. बी. किशोर यांनी विद्यार्थ्यांसाठी “SBK – Academic Practical and Viva Generator” हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अभिनव शैक्षणिक साधन विकसित केले आहे.

              या चॅट-आधारित प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा व Viva Voce साठी आवश्यक माहिती अत्यंत संक्षिप्त व परीक्षाभिमुख स्वरूपात त्वरित उपलब्ध होते.

        या प्रणालीमध्ये विद्यार्थी कोर्स, विषय आणि प्रयोगाचा उद्देश (Practical Aim) नमूद केल्यानंतर त्यांना लगेच प्रॅक्टिकलचा उद्देश, संक्षिप्त सिद्धांत, स्टेपवाइज अल्गोरिदम/प्सूडोकोड, निकाल (Result) तसेच संभाव्य Viva Voce प्रश्न व त्यांची थोडक्यात उत्तरे प्राप्त होतात. ही रचना भारतीय विद्यापीठांच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या स्वरूपाचा विचार करून तयार करण्यात आली आहे.

                  यापूर्वी डॉ. किशोर यांनी “SBK_GPT” हे शैक्षणिक डिजिटल साधन तयार केले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नोट्स व परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य तयार करण्यास मदत मिळते. तसेच कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी ऑनलाइन परीक्षा व शैक्षणिक प्रक्रियेबाबत १० पेक्षा अधिक मार्गदर्शक व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

    कोविड-१९ काळात विद्यापीठाच्या पहिल्या ऑनलाइन परीक्षेच्या यशस्वी आयोजनात दिलेल्या योगदानाबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. श्रीनिवास वर्खेडी यांनी डॉ. किशोर यांच्या कार्याचे कौतुक केले होते.

या उपक्रमामुळे २०२० मध्ये सुमारे १.२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणे सुलभ झाले.

 डॉ. किशोर यांना शैक्षणिक नवोपक्रम, डिजिटल शिक्षण व तंत्रज्ञानाधारित अध्यापन क्षेत्रातील कार्यासाठी विविध स्तरांवर अनेक पुरस्कार व प्रशस्तिपत्रे प्राप्त झाली आहेत.

      शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेता, डॉ. किशोर यांनी विकसित केलेले हे साधन विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षा व Viva तयारीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

         विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून उपयुक्त ठरेल असा हा चॅटबॉक्स विकसित केल्याबद्दल डॉ. किशोर यांचे महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य तसेच विविध क्षेत्रातील हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

       दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here