Home
Home चंद्रपूर सावली पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडला. गोवंश तस्करीचा ट्रक २२.९० लाखांचा...

सावली पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडला. गोवंश तस्करीचा ट्रक २२.९० लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
71

HELLO CHANDA NEWS

    सावली,(का. प्र.) : चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सावली पोलिसांनी गोवंश तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. सावली आणि सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन ठिकाणी नाकाबंदी तोडून पळणाऱ्या एका आयशर ट्रकला पोलिसांनी पाठलाग करून पकडले असून, ३९ गोवंशीय जनावरांची सुटका करुन २२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ट्रकचालकाला पकडले तर एकजण अंधारात फरार झाला.

  १५ मार्च रोजी पहाटे ४:४५ वाजेच्या सुमारास सावली पोलीस पथक रात्रीची गस्त घालत असताना, त्यांना व्याहाड कडून सावलीकडे येणारा एक टाटा कंपनीचा आयशर ट्रक क्रमांक TS-09-UB-8387) संशयास्पद स्थितीत दिसला. पोलिसांनी सदर ट्रकला थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने ट्रक न थांबवता पोलीस स्टेशन सावली समोरील बॅरिकेड्सला धडक देऊन मूल रोडवरुन सिंदेवाहीकडे पळवला.

 घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ सिंदेवाही पोलिसांना नाकाबंदीच्या सूचना दिल्या आणि स्वतः वाहनाने ट्रकचा पाठलाग सुरू केला.

           सिंदेवाही येथेही आरोपीने पोलिसांचे दुसरे बॅरिकेड्स उडवून पळण्याचा प्रयत्न केला. अखेर सिंदेवाही शहराबाहेर हेडलाईट फुटल्यामुळे आणि पाठलागामुळे आरोपीने ट्रक थांबवला.

यावेळी पोलिसांनी शाबीर दाऊत अली (४२ वर्षे रा. यशोधरा नगर रोड नागपूर) याला अटक केली.

         तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. सदर ट्रकमध्ये जनावरांना अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयतेने चारा-पाण्याशिवाय कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने नेले जात होते.

सुटका केलेल्या सर्व जनावरांना चंद्रपूर येथील ‘प्यार फाउंडेशन’ गोशाळेत सुरक्षित रित्या रवाना करण्यात आले आहे.

     कारवाई आणि जप्ती:
१. अटक आरोपी: शाबीर दाऊत अली (वय ४२ वर्षे, रा. यशोधरा नगर रोड, नागपूर)
२. सुटका केलेली जनावरे: ३९ गोवंशीय जनावरे (किंमत अंदाजे ३,९०,०००/- रुपये).
३. जप्त वाहन: टाटा आयशर ट्रक (किंमत १९,००,०००/- रुपये).
४. एकूण मुद्देमाल: २२,९०,०००/- रुपये.

     आरोपींविरुद्ध सावली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा कलम ५(अ)९, ११, प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (घ) (ड), (ज), (झ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनिय १९८४ कलम ३ मोटार वाहन अधिनियम २३९, १७७ ८३, १७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  कारवाई पथक ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनात सावलीचे पोलिस निरीक्षक प्रदिप पुल्लुरवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे यांच्यासह पोलिस पथकाने पार पाडली.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here