Home
Home चंद्रपूर स्व. सौ. पूर्वा गौरव देव मुलींचे वसतिगृहात ‘छोटीसी आशा’ कार्यक्रम आयोजित.

स्व. सौ. पूर्वा गौरव देव मुलींचे वसतिगृहात ‘छोटीसी आशा’ कार्यक्रम आयोजित.

0
61

HELLO CHANDA NEWS

     चंद्रपूर,(का.प्र.) : सरदार पटेल महाविद्यालयात
स्व. सौ. पूर्वा गौरव देव मुलींचे वसतिगृहाद्वारे  ‘छोटीसी आशा’ स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. प्रमोद काटकर, प्रमुख अतिथी उपप्राचार्य, डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, वसतिगृहाच्या प्रभारी    डॉ. पद्मरेखा धनकर मराठी विभागप्रमुख उपस्थित होते.  

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्मरेखा धनकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात वसतिगृहात प्रवेश घेत असताना विद्यार्थिनी आपले छोटे छोटे ध्येय, स्वप्न घेऊन येत असतात. ती त्यांची स्वप्न पूर्ण व्हावी अशी ‘छोटीशी आशा’ त्यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात आपल्या महाविद्यालयातील वसतिगृहातील जीवन हा आपल्या आयुष्यातील मोठा आणि एक वेगळा टप्पा असतो,या अनुशासनाबरोबर मैत्रिपूर्ण आणि सामाजिक जीवनाचे महत्व लक्षात येते.

     आपल्या वसतिगृहात विद्यार्थींना सर्व सुख सुविधा व शैक्षणिक गरजा पूर्ण होण्या कडे मी नेहमी लक्ष देत राहील असे मनोगत प्राचार्य, डॉ. प्रमोद काटकर यांनी व्यक्त केले.

      वसतिगृहातील सेविका श्री. ठोंबरे यांचे दुःखद निधन झाले, सर्वांनी मौन पाळून त्यांच्या बद्दल श्रद्धांजली व्यक्त केली.

          ‘छोटीसी आशा’ स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात मुलींनी अनेक सुप्त गुणांचे सादरीकरण केल. त्यात एकल नृत्य, समूह नृत्य, संगीत, कविता,आणि खेळ या विविध गोष्टीतून मुलींनी आनंद व्यक्त केला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली बोरडे व महिमा बरमे यांनी केले. तर आभार लोकेश्वरी बोबडे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वसतिगृहाच्या प्रभारी डॉ. पद्मरेखा धनकर, डॉ. उषा खंडाळे, डॉ. शीतल कटकमवार, प्रा.शेफाली कुमारवार, डॉ . सपना वेगीनवार, अधिक्षक कल्पना येरावार आणि वसतिगृहातील मुलींनी परिश्रम घेतले. वसतिगृहातील सर्व मुली कार्यक्रमास उपस्थित होत्या.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here