*संत हरदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मिंडाळा येथे अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन*

0
24

===========================

 *नागभीड* 

=============================

चंद्रपूर:-नागभीड तालुक्यातील संत हरदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मिंडाळा येथे सर्प विज्ञान, चमत्कारामागिल विज्ञान व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम.जाधव यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम प्राचार्य प्रभाकर फुकट, पर्यवेक्षक नानाजी चौके यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. जाधव यांनी अंधश्रद्धेवरील गित सादर केल्यानंतर प्राचार्य फुकट यांचे हस्ते बिना वातीच्या पाण्याने पेटणाऱ्या दिव्याचे प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. जादूटोणा, भुत, भानामती, करणी, मंत्राने विषारी सापाचे विष उतरविणे, नरबळी दिल्याने गुप्त धन प्राप्त होणे या सर्व भ्रामक कल्पना आहे. ढोंगी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी समाजामध्ये पेरलेल्या अफवा आहे त्यावर विश्वास ठेवू नका. अंधश्रद्धा मुक्त समाज निर्मितीसाठी पुरोगामी संत व समाजसुधारक यांचे विज्ञाननिष्ठ विवेकी विचार आत्मसात करून त्याचा प्रचार व प्रसार करा असे आवाहन याप्रसंगी जाधव यांनी केले. जाधव यांनी सर्प विज्ञानावर सविस्तर माहिती दिली. तथाकथित चमत्काराबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी ढोंगी लोक दाखवित असलेल्या तथाकथित चमत्कारासारखेच विज्ञानावर आधारित दोरीचा साप बनवून त्याला दुध पाजणे, दिव्यात पाणी टाकून पेटविले, रिक्त कलशातुन तीर्थ काढणे, हातावर जळता कापूर खेळवून तोंडात टाकणे यासारखे विज्ञानावर आधारित अनेक प्रयोग दाखवून त्यामागील कार्यकारणभाव जाधव यांनी स्पष्ट करून सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुनिता जुनघरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उषा पंधरे, स्वाती निलावार, रूपाली बांगडकर, प्रज्ञा गणवीर ,जनबंधू,मुरमाडे, अंबादे, बोरकर, ढबाले व अमृतकर यांनी सहकार्य केले. याप्रसंगी विद्यालयाचे ३०० चे वर विद्यार्थी उपस्थित होते असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे. =============================                    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*                                              ============================                        कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                                संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here