चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासन अवैद्य धंद्यावीरोधी अलर्ट मोड वर. पोलीस अधीक्षक यांचे आदेश

0
8

================================            *चंद्रपूर* =================================

चंद्रपुर जिल्हात अवैध धंद्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन साहेब, चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती. रिना जनबंधु मॅडम, चंद्रपुर यांनी दिले. ===============================            त्या अनुषंगाने आज तारीख 11/07/2024 रोजी रात्री 01:00 वाजता गोपनीय माहीतीच्या आधारे एक ट्रक अवैध गोवंशीय जनावरे कृरतेने वाहनात भरून वाहतुक करीत असल्याचे खबरेवरून सावली पो.स्टे. तील अधि. व अंमलदार यांनी बस स्थानक सावली येथे छापा कारवाईसाठी सापळा लावला असता सदर अवैध गोवंशीय जनावरे वाहतुक करणारा ट्रक हा भरधाव वेगाने नेवुन पुळुन जाण्याच्या उद्देशाने मुलच्या दिशने पळाला सावली पो.स्टे. तील अधि. व अंमलदार यांनी पाठलाग केला असता सदर ट्रक चालकास पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच आपले ताब्यातील ट्रक खेडी फाटा येथे थांबवुन ट्रक चालक व एक ईसम पळुन गेला. जप्त टाटा कंपनीचा ट्रक क्र. MH-34, BG-6307 त्यामध्ये 33 नग गोवंशीय जनावरे किंमत. 3,30,000/- रुपये व नमुद वाहन किमंत. 10,00,000/- रुपये असा एकुन 13,30,000/- रुपयेचा माल मिळुन आल्याने महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनीयम 1976, प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनीयम 1960, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 व मोटार वाहन अधिनीयम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ==============================              सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भगत साहेब, मुल यांचे मार्गदर्शना खाली सपोनि. जिवन राजगुरू, पोहवा. विनोद निखाडे/1169, पोअ. विजय कोटनाके / 1697, पोंअ. कपील भंडारवार/2553 पोलीस स्टेशन सावली यांनी केली. ============================               *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================                     कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                                  संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356

उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here