Home
Home चंद्रपूर *परभणी जिल्ह्याला लाभले वर्दीतल्या माणसाचे दर्शन!*

*परभणी जिल्ह्याला लाभले वर्दीतल्या माणसाचे दर्शन!*

0
93

===============================

परभणी(वि.प्र.): परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात रवींद्रसिंह परदेशी यांनी आपल्या कुटुंबियासह रक्तदान केल्याने “परभणी जिल्ह्याला लाभले वर्दीतल्या माणसाचे दर्शन” असे उद्गार बुद्धिजीवी वर्गाकडून काढले जात आहे हे मात्र विशेष!

अधिकारी येतात आणि जातात परंतु काही अधिकारी असे असतात जे जिथे जातात तिथे आपले नावलौकिक करतात यातीलच एक विशेष असे व्यक्तिमत्त्वाचे धनी व आपले कार्य पूर्ण कर्तव्यनिष्ठेने करून जनहित कार्यात आपले आयुष्य लावून टाकतात. बोलणे सोपे असते परंतु त्याचे अनुकरण करणे हे तितकेच कठीण असते. चंद्रपूर जिल्ह्यात तत्कालीन चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांनी आपली एक विशेष ओळख निर्माण केली होती. पोंभूर्णा येथील एका विद्यार्थ्याला भेटून त्याच्याशी हितगुज केली होती तसेच त्याला विशेष मार्गदर्शनही केले होते या घटनेनंतर जन सामान्यांच्या मनात रवींद्रसिंह परदेशी यांनी एक विशेष जागा निर्माण केली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आता ते परभणी चे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे दिनांक आठ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने साजरा करण्यात आला व रक्तदान शिबिर च्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आल्याने परभणी जिल्ह्यात परभणी जिल्हा पोलीस दलाची प्रशंसा केली जात आहे.

“बोलावे तैसे चालावे त्याचे वदनी पाऊले”या उक्तीप्रमाणे कार्य करणे यासाठी विशेष धाडस लागतो. परंतु परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या रक्तदान कार्यक्रमात मानवतेचे ज्वलंत उदाहरण कायम केले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे रवींद्रसिंह परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदानाच्या कार्यक्रमात अनेक अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले परंतु उल्लेखनीय बाब अशी की या रक्तदान कार्यक्रमात परभणी चे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रीती रवींद्रसिंह परदेशी आणि पुत्र विक्रांत सिंह यांच्या समवेत रक्तदान करून “सर्व माणसं सारखीच” हा वाक्य सार्थक केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या रक्तदान बाबत विशेष कौतुक केले जात आहे हे मात्र विशेष!

परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी कुटुंबियासह या रक्तदान कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस उपाधीक्षक दिलीप टिप्परसे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार पोलीस निरीक्षक दंतुलवार पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या सह एकूण 41 पोलीस अधिकारी अंमलदार यांनी रक्तदान केले.

या रक्ताचा उपयोग सामान्य रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी होणार आहे.
या रक्तदानासाठी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीयुत नागेश लखमावार यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या टीमसह अथक परिश्रम घेतले त्याचप्रमाणे पोलीस हॉस्पिटलचे डॉक्टर शेख व त्यांची टीम देखील यावेळी उपस्थित होती या सर्वांचे उत्कृष्ट असे नियोजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व त्यांच्या चमूने केले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here