Home
Home चंद्रपूर जागतिक आदिवासी दिनी संस्कृतीचे जतन आणि विकासाचा संकल्प करा – आ. किशोर...

जागतिक आदिवासी दिनी संस्कृतीचे जतन आणि विकासाचा संकल्प करा – आ. किशोर जोरगेवार जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

0
79

================================

जागतिक आदिवासी दिनी संस्कृतीचे जतन आणि विकासाचा संकल्प करा – आ. किशोर जोरगेवार ================================

जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा ================================

जागतिक आदिवासी दिन हा दिवस केवळ एक सण किंवा उत्सव नसूनआपल्या आदिवासी बांधवांच्या संघर्षसंस्कृतीआणि त्यांच्या अनमोल योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आजचा हा दिवस साजरा करत असतानाचिंतन मंथन करून संस्कृतीचे जतन आणि विकासाचा संकल्प करा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.    

 

    आदिवासी विकास विभाग आणि विविध आदिवासी संघटनांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कारागृहातून निघालेल्या रॅलीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंतर सदर रॅली प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात पोहोचलीयेथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला आदिवासी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवारबिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावीयंग चांदा ब्रिगेड आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथेअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा मसरामप्रमोद बोरीकरसुरेश पेंदामअफ्रोड संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय कुमरेआदिवासी टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश मडावीविजय सुरपामरंजित मडावीदिनेश परतेकीअविनाश मडावी आदि उपस्थित होते.

     यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीआदिवासी समुदायांनी आपल्या मातीतून घेतलेल्या संस्कारांना जपले आहेआणि त्यांच्या जीवनशैलीतून आपल्याला निसर्गाशी असलेल्या जवळीकतेची ओळख होते. आपली भाषाकलासंगीतनृत्यआणि रीती-रिवाज हे आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या परंपरांनी आपल्या समाजाला एक नवा दृष्टिकोन दिला आहे – आपल्या निसर्गाशीआपल्या पर्यावरणाशीआणि आपल्या सामाजिक नात्यांशी. आदिवासी समाजाच्या संघर्षाची कहाणी फार जुनी आहे. आत्मविश्वासाने आणि संघर्षाने आपण आपली ओळख कायम ठेवली आहे. आपली संस्कृतीची समृद्धता आणि जीवनशैली अनेक बाबतीत मार्गदर्शन करत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

      आदिवासी समाजाने आता विकासाच्या मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. आपण या जिल्हाचे मालक आहात त्यामुळे मालकाच्या भूमिकेत आपण असले पाहिजे. शासनाच्या विविध योजना अशा आयोजनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. समाजातील विद्यार्थी प्रतिभावान आहेतत्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचेही ते या प्रसंगी म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ================================                कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here