===============================
शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केल्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत विमा भरलेला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा दिला जातो. या संदर्भात, नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करणे आवश्यक आहे. यामध्ये जास्तीचा पाऊस, अतिवृष्टी, पिक वाहून जाणे आणि शेतात पाणी साचणे यांचा समावेश आहे.
तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 14447 किंवा क्रॉप इन्सुरन्स अॅपचा वापर करावा. तसेच, ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी. तक्रार केल्यानंतर देण्यात आलेला डॉक्युमेंट आयडी क्रमांक साठवून ठेवावा, ज्यामुळे भविष्यात नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मदत होईल.
असे आवाहन भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू गौरकर यांनी केले आहे. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























