*”अहेरीचा राजा” गणरायाला भावपूर्ण निरोप..!!*

0
8

==================================

*“निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी”*                       

अहेरी परिसरातील आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव महाराज यांचा राजमहाल समोर विराजमान “अहेरीचा राजा” गणरायाचे नुकतेच थाटात विसर्जन करण्यात आले. अहेरी राजमहालातून निघालेल्या भव्य विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. वारकरी भजन मंडळ, प्रसिद्ध बाबुळगाव येतील ढोल पथक तसेच पारंपारीक वाजंत्री तसेच नागपुरचा प्रसिद्ध डिजेचा मिरवणुकीत समावेशामुळे गणेश विसर्जन संस्मरणीय ठरला. मिरवणुक बघायला अहेरीतील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. राजमाता राणी रुक्मीणी देवी, राजे अम्ब्रीशराव महाराज, कुमार अवधेशराव बाबा तसेच राज परिवारातील सदस्य मिरवणुकीत सामील झाले होते. राजमहालातून निघालेली मिरवणुक अहेरी राजनगरीचा मुख्य मार्गाने फिरून वांगेपल्ली येथे प्राणहिता नदी घाटापर्यंत चालली. प्राणहीता नदीच्या प्रवाहात रात्री बाप्पाचे पूजन व आरती करून विधीवत विसर्जन करण्यात आले.                                                 
मात्र गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे विसर्जनाच्या वेळेस पाणावले होते. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..असे साकडे घालत लाडक्या गणरायाला निरोप दिला जात होता. विसर्जन मिरवणुकीत रस्त्याचा दुतर्फा तसेच प्रत्येक चौकाचौकात अहेरीचा राजाचा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती, या पार्श्वभूमीवर अहेरीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,..!    ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==================================          कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here