*कुणबी समाजातील पोटजाती एकत्रित येणे काळाची गरज माझी खासदार मधुकर कुकडे*

0
18

=============================

    *चंद्रपूर*     

==============================
या देशामध्ये कुणबी समाजाची संख्या 40 टक्के मोठ्या प्रमाणात आहे परंतु हा समाज अनेक पोटजातीमध्ये विखुरला असल्याने स्वातंत्र्याच्या पंचात्तर वर्षानंतरही अनेक समस्यांनी ग्रस्त आहे शासन प्रशासनामध्ये कुणबी समाजाला नगण्य प्रतिनिधित्व मिळालं आणि म्हणून कुणबी समाजातील पोट जातींनी एकत्रित येणे काळाची गरज आहे असे विचार राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने आयोजित चंद्रपूर येथील राजवाडा हॉटेल येथे संपन्न झालेल्या कुणबी समाजाच्या भव्य मेळाव्यात उदघाटक म्हणून बोलताना भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार माननीय मधुकरजी कुकडे यांनी असे विचार व्यक्त केले यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष प्रसिद्ध पत्रकार दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर हे होते त्यांनी कुणबी समाजाची जातीय जनगणना झाली पाहिजे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायत पासून तर लोकसभे पर्यंत आणि शिपायापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली. आणि लवकरच दिल्ली येथे राष्ट्रीय कुणबी महासंघाचे केंद्रीय कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा डि.के.आरीकर यांनी सांगितले यावेळी मंचावर राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष डी. के. आरीकर , उदघाटक मधुकरजी कुकडे उपाध्यक्ष प्राध्यापक शेषराव येलेकर डॉक्टर बळवंत भोयर,प्रवक्ते राजूभाऊ राऊत सचिव रमेश मुरकुटे महिला विंगचे प्रदेश अध्यक्ष रीनाताई पांडे मुंबई एडवोकेट संजय ठाकरे गडचिरोली धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट हिराचंद बोरकुटे भूमिपुत्र ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉक्टर अभिलाषा कावतुरे विनोद नवघरे वैशाली रोहनकर पी.एस. आरीकर,सुधाकर काकडे उमाकांत धांडे धनराज दोनोडे जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पाहुण्यांच्या हस्ते मानल्या पर्ण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होण्याआधी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू दिवंगत डॉक्टर सुभाष चौधरी यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाला कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना पाहुण्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. आणि नागपूर मध्ये लवकरच कुणबी महासंघाचे भव्य अधिवेशन घेण्याबाबत ठरले कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून पदाधिकारी आले होते त्यात प्रामुख्याने नागपूरवरून डॉक्टर प्रदीप महाजन,टेमराज माले, राम रतन देशमुख, पुंडलिक ठाकरे प्रकाश काळबांडे यवतमाळ वरून विनोद दोनदल संदीप तेलंगे वर्धा वरून महेंद्र शिरोळे सचिन तुळणकर,विनोद सातपुते युवक अध्यक्ष स्वप्निल लोणकर चंद्रकांत कुंभारे, शरद जीवतोडे, रवी भोयर मूलवरून राजेश ठाकरे पंकज कोहळे,संतोष चिताडे,पंकज लाडवे,संदीप मोरे तर सावली वरून लालाजी भोयर बल्लारपूर वरून सुधीर कोरडे, राजेश बट्टे वनी वरून एडवोकेट विजया शेळके यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सचिव रमेश बोरकुटे जिल्हा अध्यक्ष अतुल ठाकरे,संजय फाले,दीक्षा कष्टी, उर्मिला बोबडे,पानघाटे अनिल फाले आशिष येडांगे यांनी परिश्रम घेतले,     =================================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here