================================
चंद्रपूर 💠किरण घाटे💠
महाराष्ट्र विद्यूत मंडळ व चंद्रपूर मनपावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तडफदार व झुंजार युवा नेते राहुल देवतळे यांनी काल चांगलाच रोष व्यक्त केल्याचे दिसून आले. 
विद्युत मंडळाचे कर्मचारी ग्राहकांना त्रास देत असल्याचे ते म्हणाले.
एव्हढेच नाही तर घरगुती वापरातील विद्यूत बिल तात्काळ भरले नाही तर लाईन कट करण्याची ते धमकी सुध्दा देत असतात.या पुढे हा प्रकार कधीच खपवून घेणार नसल्याचे देवतळे यांनी गुरुवारी एका लक्षवेधक धरणे आंदोलनात बोलताना ठासून सांगितले. 
त्यांनी आपला चंद्रपूर मनपावरही चांगलाच रोष व्यक्त केला आहे.आम्ही मागणीचे निवेदन सादर करतोय पण महिनेंगिणती आम्हाला निवेदनाचे उत्तर मिळत नसल्याचा चक्क आरोप देवतळे यांनी केला आहे.
शहरातील पाणी पुरवठा बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे दिग्गज नेते दिपक जयस्वाल याप्रसंगी इच्छुक उमेदवार भानेश मातंगी यांनी सुद्धा अनेक मुद्द्यावर आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी , याप्रसंगी बब्बू हिसा, सुहास पिंगे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यांनी देखील मनपावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,
























