*मागीतली निवडणूक लढण्याची परवानगी व रजा दिला नवा अतिरिक्त कार्यभार*

0
25

================================

*मागीतली निवडणूक लढण्याची परवानगी व रजा दिला नवा अतिरिक्त कार्यभार*         ================================

*नागरीकाच्या मुलभूत व वैद्यानिक हक्क हिरावला*  ==================================

*जिल्हा परिषद चंद्रपूर चा प्रताप*चंद्रपूर*- जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत गट साधन केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्याने आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करीत परवानगी मागीतली परंतू जिल्हा परिषदेने परवानगी तर सोडाच परंतू त्या कर्मचाऱ्यावर नविन अतिरिक्त कार्यभार दिल्याने एका नागरिकाचा मुलभुत व वैद्यानिक हक्क जि.प. ने हिरावून घेतला आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत गट साधन केंद्र मुल येथे समग्र शिक्षा अंतर्गत डाटा एन्ट्री कम असिस्टंट पदावर कार्यरत प्रविण कुमरे यांनी येणारी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करीत ८ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे रितसर निवडणूक लढण्याची परवानगी व रजा मंजूरी करीता अर्ज केला. परंतू या अर्जाचा कोणताही विचार झाला नाही. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी स्मरणपत्र देऊन परवानगी देण्याची विनंती केली गेली. परंतू शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी निवडणूक लढण्याची परवानगी तर सोडाच परंतू या कर्मचाऱ्यावर पुन्हा पंचायत समिती सावली येथील रोखपाल व वरिष्ठ लिपिक पदाचा तात्पुरता प्रभार सोपविण्यात येत असल्याचा आदेश १५ सप्टेंबरला देण्यात आला. गट साधन केंद्रात डाटा एन्ट्री ऑपरेटर तथा सहाय्यक पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यावर मुल पंचायत समितीच्या रोखपाल व वरिष्ठ लिपीक पदाचा अतिरिक्त प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. आणि आता निवडणूक लढविण्याची परवानगी मागीतली असता त्यांचेवर पुन्हा सावली येथील समग्र शिक्षा अंतर्गत रोखपाल व वरीष्ठ लिपिक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अश्याप्रकारे कर्मचाऱ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप प्रविण कुमरे यांनी केला असून परवानगी देण्याची मागणी केली आहे.
*राज्य प्रकल्प संचालकाकडे जिल्हा परिषदाचे मार्गदर्शनाकरीता पत्र*=====
समग्र शिक्षा जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत गट साधन केंद्र मुल येथे डाटा एन्ट्री तथा सहाय्यक पदावर कार्यरत कर्मचारी प्रविण कुमरे यांनी ७०-राजुरा विधानसभेची निवडणूक लढण्याकरीता परवानगी व या काळातील रजा मंजूरी करीता विनंती अर्ज केला. त्यांच्या अर्जावर जिल्हा परिषदेने विचार न करता त्यांचे मुलभुत हक्काची अवहेलना करीत त्यांना परवानगी तर दिली नाही परंतू पुन्हा सावली येथे नविन पदाचा प्रभारी कार्यभार सोपविला. त्यानंतर जिल्हा परिषदेने १९ सप्टेंबर रोजी राज्याच्या प्रकल्प संचालकाकडे निवडणूक परवानगी व रजा मंजूरी करता येईल का यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करण्याकरीता पत्र दिलेले आहे.
*दोन महिणे जिल्हा परिषदेचा वेळकाढूपणा*=======≠==
जुलै महिण्यात मागीतलेली परवानगी करीता जिल्हा परिषदेने सप्टेंबर महिण्यात प्रकल्प संचालकाकडे मार्गदर्शन मागीतल्याने दोन महिणे जिल्हा परिषद प्रशासनाने वेळकाढूपणा करीत आता मार्गदर्शनाचे ढोंग करून एका कर्मचाऱ्याच्या हक्कावर गदा आणली आहे असा आरोप प्रविण कुमरे यांनी केला असून याबाबत न्यायासाठी लढू असे मत व्यक्त केले आहे.
📌का जिल्हा परिषद परवानगी देण्यास सक्षम नाही ?
📌का दोन महिने निवडणुकीचा विषय अडवून ठेवणे दप्तर दिरंगाई नाही ?
📌कोण आहे यांचा वरदहस्त ?
📌का कुणी थांबावतोय या प्रशासनाला ?
📌का हे राजनीतिक षडयंत्र आहे ?
*अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील या प्रशासनाला…….*     =================================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   =================================          कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here