===============================
*आता ते तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार? सगळीकडे हीच चर्चा!*
चंद्रपूर(वि. प्र.):चंद्रपूरचे विद्यमान आमदार आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे त्यामुळे आता ते सुधारी चिन्हावर निवडणूक लढविणार काय हा प्रश्न निर्माण झाला असून विश्वसनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली आहे की 17, 18, 19, ऑक्टोबर पर्यंत ते मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात ते प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सुत्राद्वारे माहिती मिळाली आहे.
असे झाल्यास व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याची तिकीट किशोर जोरगेवार यांना मिळाल्यास किशोर जोरगेवार यांचे पारडे जर होणार असे देखील बोलले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहणार असे चित्र स्पष्टपणे दिसत असून किशोर जोरगेवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची उमेदवारी मिळाल्यास याचा लाभ त्यांना फार मोठ्या प्रमाणात होणार आहे याच्यात तीळ मात्र ही शंका नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षांनीही आम्हाला हा तिकीट मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केला असला तरीही महाविकास आघाडीत तिकिटाचे वाटप कसे होणार यावरूनच चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार कोण हे ठरणार आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांना चंद्रपूर विधानसभा ची उमेदवारी निश्चित झाल्यास किशोर जोरगेवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केल्यास ते पुन्हा एकदा बाजी मारतीलच असे बुद्धिजीवी वर्गाकडून बोलले जात आहे, हे मात्र विशेष.
विश्वासनीय सुत्राद्वारे अशी ही माहिती मिळाली आहे की किशोर जोरगेवार यांनी आपल्या निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली आहे. तसेच विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य तसेच चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्याशीही त्यांनी संपर्क साधल्याची सूत्राद्वारे माहिती मिळाली असून चंद्रपूर शहरात ही चर्चा सगळीकडे होत आहे, हे मात्र विशेष!
आता पुढे पुढे पाहू होणार तरी काय इच्छुक उमेदवार आपल्याला तिकीट मिळावी यासाठी करणार कोण कोणते उपाय? ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,