Ngo फुलोरा फौंडेशन कडून वृक्षारोपन मोठ्या परियोजनेची चंद्रपूरला सुरवात

0
12

==================================

*चंद्रपूर.*       ================================
चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर स्थित असलेल्या बॉटनिकल गार्डन विसापूर येथे. वनविभागाच्या विशेष मदतीने फुलोरा फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने एक अभिनव उपक्रम घेण्यात आला सदर उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री जितेंद्र रामगावकर सर  चीफ फॉरेस्ट कन्सर्वेटर चंद्रपूर, तर उद्घाटक म्हणून डेप्युटी चीफ फॉरेस्ट कंजर्वेटर  श्वेता बोडू मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून श्री एम के तांगडे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भाग दोन, फुलोरा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री अरुणजी सबनीस, फुलोरा फाउंडेशन नागपूर डायरेक्टर संजयजी देवगडे,श्री विवेक देशपांडे,  श्री गोपाळ पाटील, श्री नचिकेत पाटील, व विदर्भ रिजनचे व्यवस्थापक श्री नोमेश पाटील, जनाब अतहर परवेज कामठी, प्रामुख्याने उपस्थित होते.                कार्यक्रमाचे उद्घाटन हे वृक्षारोपण करून करण्यात आले, मान्यवरांचे स्वागतही विविध प्रकारच्या वनस्पतीचे वृक्ष देऊन  स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात श्री रामगावकर सर यांनी सांगितले की हा प्रकल्प उभारण्याची आणि त्या मागची भूमिका या पद्धतीची होती की सध्या महाराष्ट्रात बॉटनिकल गार्डन प्रमाणे डेस्टिनेशन नसल्यामुळे बॉटनी विभागाच्या व इतरही शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून औषधी वनस्पतीचा अन त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याचा मोठा मानस येथे उभा आहे. त्याचा जनतेने विद्यार्थ्यांनी अभ्यास करणाऱ्यांनी व औषधी वनस्पती कार्य करणाऱ्यांना पुरेपूर लाभ व्हावा या दृष्टिकोनातून या बॉटनिकल गार्डन चे संवर्धन व संगोपन करण्यात येत आहे आणि यासाठी फुलोरा सारख्या स्वयंसेवी आणि स्वयं प्रेरणा संस्थेने पुढाकार घेतलीयाबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.                                             या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्री शशिकांत मोकाशे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आधार आभार प्रदर्शन श्री नोमेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. हैदराबाद येथील नर्सरीचे मालिक श्री राजेश जी दुबे, वृक्ष लागवडीतील तज्ञ जनाब फैजान भाई, पार्थ तरोडे, सुभाष तेलतुंबडे व कळत नकळत बॉटनिकल गार्डन येथील कर्मचारी व व्यवस्था,  बोटॅनिकल येथील ट्रान्सपोर्ट विभाग यांचे सर्व मान्यवरांनी मनापासून आभार मानून सदरचा कार्यक्रम समाप्त करण्यात आला.       =================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     =================================          कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here