=================================
*बल्लारपूर,* ================================ दि.२४ – बल्लारपूर शहरात विविध जाती, धर्म व पंथाचे लोक वास्तव्यास आहेत. समाजात ऐक्य, शांतता आणि परस्पर बंधूभाव देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मागील अनेक वर्षांपासून जनसेवेचे व्रत हाती घेतले असून जात, पात, धर्म, वंश न पाहता सर्वसामान्य व कष्टकऱ्यांची सेवा करणे हा भाव मनात ठेवून कार्य केले आहे. बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासाकरीता सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सर्वधर्म समभाव ठेवून एकत्रित येऊन कार्य केल्यास जिल्ह्याच्या तसेच देशाच्या प्रगतीत हातभार लागेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.बल्लारपूरात सर्व धर्मीयांचे एकत्रीकरण व्हावे, या उद्देशाने “भारत माता” सभागृहाची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
बल्लारपूर येथे आयोजित सर्वधर्म सद्भावना कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला भंतेजी भिख्खू खेमाजी, जगदीश सिंग, तिरलोक सिंग ग्यानीजी, पास्टर गोपाल अटकुरे, राकेशजी पांडे, अहमद रजा नूरानीजी, रविश सिंग, साजिद कुरेशी तसेच सर्वधर्मीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राजनीतीपेक्षाही मोठी राष्ट्रनिती आणि देशनिती आहे, असे सांगून मागील अनेक वर्षांपासून जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर, नांदेडमधील गुरुद्वारा तसेच नागपूरमधील ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्याकरिता निधी उपलब्ध करून दिला. मानवता हाच खरा धर्म आहे. मानवता धर्म पाळत विकासाचे राजकारण केले. जिल्ह्यातील टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटल हे कोणत्या विशेष जाती, धर्मासाठी नव्हे तर सर्व धर्मियांसाठी उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारा प्रत्येक धर्माचा व्यक्ती चेहऱ्यावर आनंद व समाधान घेऊन जाईल. मतदारसंघाच्या विकासाकरिता कृषी महाविद्यालय, बसस्थानके, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कार्पेट युनिट, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, सिमेंट रोड तसेच पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना निर्माण करण्यात आल्या आहेत. ================================ ना. मुनगंटीवार म्हणाले,
बल्लारपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील विकास कामांची चर्चा देशभरात होत आहे. विकास कामांच्या बाबतीत बल्लारपूर मतदारसंघ देशात आदर्श बनेल, असा विश्वास व्यक्त करत हा जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी केला. येत्या पाच वर्षात येथील गोरगरिब व कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणार असल्याचे ना.मुनगंटीवार म्हणाले. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*
























