Home
Home चंद्रपूर *29 दिसंबर ला चंद्रपुरतील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित श्री स्वामी समर्थ...

*29 दिसंबर ला चंद्रपुरतील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्र लीलावर आधारित “ब्रम्हांडनायक” महानाट्य ला प्रचंड प्रतिसाद*

0
78

===============================     

*29 दिसंबर ला चंद्रपुरतील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्र लीलावर आधारित “ब्रम्हांडनायक” महानाट्य ला प्रचंड प्रतिसाद*

* चंद्रपूर*

संत ईश्वराचे सगुण रूप असतात त्यामुळे ईश्वराचे सर्व गुण त्यांच्यामध्ये दिसून येतात याच गोष्टींवर श्रद्धा असलेल्या भक्तांना याची प्रचिती वेळोवेळी येत असते मात्र काहींचा यावर विश्वास नसतो अशावेळी संत अनेक घटनांद्वारे याची प्रचिती आणून देत असल्याने ईश्वराप्रती श्रद्धा वाढते. संत हे ईश्वराचे सर्वज्ञ असतात याची जाणीव दत्तअवतार अक्कलकोट श्री स्वामी समर्थांनी करून दिली श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत *भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे* *हम गया नही जिंदा है* हाच संदेश घेऊन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ परिवार ट्रस्ट चंद्रपूर द्वारा आयोजित तथा देव्हारा निर्मित नागपूर यांचा संयुक्त विद्यमानाने आयोजित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्र लिलांवर आधारित *ब्रम्हांडनायक* महानाट्य हे दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०७ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ महाराजांची भूमिका सिने अभिनेता श्री अशोक कुलकर्णी यांनी साकारलेली होती. त्याचबरोबर महाराजांनी कुठे कुठे वास्तव्य केले याचे वर्णन या नाटकाच्या स्वरूपात करण्यात आले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कर्दळीवनात वारुळात प्रकट होणे त्यांचे भारत भ्रमण मंगळवेढ्याच्या जंगलात बसप्पा दिलेली प्रचिती, सोलापूर येथील टोळबुवांना दिलेला साक्षात्कार अक्कलकोट येथील खंडोबा मंदिरात आगमन भक्त चोळाप्पा यांच्याकडे वास्तव्य व वटवृक्षाच्या छत्रछायेत येत वास्तव्य जाऊनी, सुंदराबाईंचे चरित्र, स्वामी सुताचे सुतोवाच, शेवटी स्वामी समाधीस्थ या सर्व वर्णनांवरून व चरित्रावरून या महानाट्याचा प्रयोग करण्यात आला . या महानाट्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने व प्रमुख पाहुण्यांच्या सन्मानाने करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रजनीताई हजारे सामाजिक कार्यकर्त्या व अध्यक्षा सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक चंद्रपूर, माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ. विजय आईंचवार अध्यक्ष कन्यका नागरी सहकारी बँक चंद्रपूर, प्राचार्य अशोक जी जीवतोडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी समाज व ॲड रवींद्र जी भागवत ज्येष्ठ विधीज्ञ या सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या महानाट्याच्या प्रयोगाकरिता देव्हारा निर्मितीचे ज्योती डहाके व ज्यांची संकल्पना होती शशिकांत डहाके दिग्दर्शक सुबोध सुरजीकर तथा त्यांची संपूर्ण चमु त्याचबरोबर श्री अक्कलकोट स्वामी समर्थ परिवार ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती मीनाताई देशकर परिवाराचे, उपाध्यक्ष श्री मोहन ठाकरे, सचिव श्री अनिल गटलेवार, जयदीप देशकर, सचिन शिवणकर, उल्हास मोहरील, नंदू चौधरी, मनीष गायकवाड यांनी अथक परिश्रम केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुग्धा तरुण खांडे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता केली.    ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ==============================              कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here