=================================
*वरोरा शहरात अखिल भारतीय खासदार चषक कबड्डी स्पर्धा
दहा ते बारा जानेवारी दरम्यान* ===============================
वरोरा स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर स्मृती प्रित्यर्थ अखिल भारतीय खुले खासदार चषक पुरुष व महिलांच्या कबड्डी स्पर्धा दहा ते बारा जानेवारी दरम्यान जय हिंद क्रीडा मंडळ वरोरा च्या वतीने जुने कॉटन मार्केट मैदानावर आयोजित करण्यात आले आहे
जय हिंद क्रीडा मंडळ वरुणाच्या वतीने खासदार चषक अखिल भारतीय खुले कबड्डी सामने मॅटवर खेळवले जाणार आहे स्पर्धेचे उद्घाटन 10 जानेवारीला सायंकाळी सात वाजता माजी मंत्री शिवाजी मोघे यांच्या हस्ते केले जाणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रतिभा धानोरकर राहणार आहे यावेळी आमदार सुधाकर अडबाले व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 11 जानेवारीला सायंकाळी सात वाजता मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे 12 जानेवारीला सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण केले जाणार आहे यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुभाष धोटे आमदार अभिजीत वंजारी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर स्पर्धेत भारतातील पुरुष व महिलांचे नामांकित संघ सहभागी होणार आहेत पुरुष व महिलांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या संघास रोख रक्कम व चषक दिले जाणार आहे पुरुषांमध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू बुलेट दुचाकी महिला उत्कृष्ट खेळाडू स्कुटी दिली जाणार आहे तरी या या स्पर्धेचा वरोरा परिसरातील पुरुष व महिलांनी युवक युतीने आनंद घ्यावा असे आव्हान जय हिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण काकडे सचिव कासिफ खान व जय हिंद क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी केले आहे, =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे *मुख्य संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356* *उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*