Home
Home चंद्रपूर *चंद्रपूर – गडचिरोली संपादक – पत्रकार संघच्या वतीने पत्रकार दिन साजरा*

*चंद्रपूर – गडचिरोली संपादक – पत्रकार संघच्या वतीने पत्रकार दिन साजरा*

0
88

==============================

*चंद्रपूर – गडचिरोली संपादक – पत्रकार संघच्या वतीने पत्रकार दिन साजरा*

*विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार*

चंद्रपूर /- दिनांक ८ जानेवारी रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय व सभागृह, चंद्रपूर येथे सायंकाळी ४ वाजता
चंद्रपूर – गडचिरोली संपादक – पत्रकार संघच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजिन डी. एस. ख्वाजा ( उपसंपादक – विदर्भ केसरी ), कुमार जुनमलवार ( संपादक – साप्ताहिक कुमार दर्पण ), रकिब शेख ( संपादक – साप्ताहिक कोल सिटी खबर ), मोरेश्वर उधोजवार ( संपादक – अर्ध साप्ताहिक खरे वृत्तांत ) यांनी केले. कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी राजेश सोलापण ( अध्यक्ष – महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ ), उदघाटक आशिष माशीटकर, प्रमुख उपस्थिती ऍडव्होकेट नवाज शेख, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद कुमार तिवारी, राजू कुकडे ( संपादक -भूमी पुत्राची हाक ),  हॅलो चांदा न्यूज चे संपादक शशी ठक्कर,अनिल देठे ( संपादक – विदर्भ समाचार ) प्रशांत विघ्नेश्वर ( अध्यक्ष – श्रमिक पत्रकार संघ ) मंच्यावर उपस्थित होते. सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली तसेच दीप प्रजवलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना रकिब शेख यांनी दिल. या कर्यक्रमात विविध क्षेत्रातील निष्ठेने व प्रामाणिकतेणे कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ज्यामध्ये विनोद कुमार तिवारी (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), सरेंद्र तिवारी (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), वैष्णवी चिनाला ( गुणवंत छात्रा ), नंदा बिहाडे ( सामाजिक कार्यकर्ता )राजश्री शिंदे ( सामाजिक कार्यकर्ता), सुनील गेडम ( पत्रकार ), अमान कुरेशी ( पत्रकार ) चा सत्कार पुष्पगुछ, शाल व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
सदर कार्यक्रमात चंद्रपूर व गडचिरोली क्षेत्राचे नामवंत प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडया आणि पोर्टल मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नौशाद शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल देठे यांनी केले. कार्यक्रमची सांगता राष्ट्रगानने करण्यात आली.    ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     =============================                कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे *मुख्य संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356* *उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here