================================
*मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले श्री महाकाली मातेच दर्शन.* =============================== *चंद्रपूर*
===============================
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार दिनांक १०/०१/२०२५ ला श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर ला भेट दिली व आई जगदंबा श्री महाकाली मातेच दर्शन घेतले. श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर तर्फे महाकाले परिवारातील सौ आशाताई प्रकाश महाकाले, सौ. क्षमाताई सुनील महाकाले, सौ. अँड निमीषा अनिल महाकाले व सौ. अर्चना संदीप महाकाले यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना परंपरे नुसार औषवान व पंचारती ओवाळले.
मंदिराचे व्यवस्थापक सुनील नामदेवराव महाकाले, व संदीप नामदेवराव महाकाले, वेदांत संदिप महाकाले, कार्तिक सुनील महाकाले यांनी मंदिर व्यवस्थापनाचे वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले व मातेचे दर्शन घेतले. भविष्यात भाविकांच्या सोयीसाठी उपाय योजना करिता निवेदन सादर केले. तसे या पूर्वी शासनाने विकास कामा करिता उपलब्ध करून दिलेला ७० कोटी अखर्चित निधी चा वापर करून लवकरात लवकर विकास कामे सुरू करण्यात यावी करिता विनंती अर्ज सादर केला. 
देवेन्द्रजी फडणवीस यांनी श्री महाकाली मातेचि महाआरती केली यावेळी मा. हंसराज जी अहीर अध्यक्ष इतर मागासवर्गीय समिती, आमदार किशोर जोरगेवार, देवराम भोगडे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
मातेच्या दर्शनानंतर मान. मुख्यमंत्री यांनी श्री महाकाली मंदिर परिसरात मान.आमदार किशोर जोरगेवार द्वारा आयोजित स्वागत समारंभ कार्यक्रमांत सहभागी झाले भारतीय जनता पक्षाचे वतीने किशोर जोरगेवार आमदार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. श्री महाकाली देवस्थान तर्फे श्री महाकाली मातेच्या फोटो दिला तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
मान्यवरांचे देवस्थान चा भेटी चा वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला. झेड प्लस सुरक्षा असल्याने मंदिर परिसरात
फक्त पासेस वाल्यानाच प्रवेश देण्यात आला होता. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे *मुख्य संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356* *उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

























