Home
Home चंद्रपूर *पोलीस अधिक्षक सा. यांच्या उपस्थितीत बल्लारपुर येथे पार पाडला तक्रार निवारण दिन,*

*पोलीस अधिक्षक सा. यांच्या उपस्थितीत बल्लारपुर येथे पार पाडला तक्रार निवारण दिन,*

0
71

============================

   *बल्लारपूर*

दिनांक-२८/०१/२०२५ रोजी पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर यांनी बल्लारपुर पोलीस ठाणे येथे भेट देवुन मा. मुख्यमंत्री सा. यांचे राज्याच्या सर्वागिण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानी १०० दिवसाचा आराखडा तयार करुन ठोस कामगिरी करण्याचे निर्देश दिल्याप्रमाणे जनतेच्या तक्रारी ऐकुन त्या निवारण करण्याकरिता तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला.

मा. पोलीस अधिक्षक सा. यांनी पोलीस ठाणे बल्लारपुर येथे भेट देवुन शांतता कमिटीची बैठक घेतली व त्यात सामाजिक सलोखा योग्य प्रकारे राखला जाईल याबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या. सदर शांतता कमिटी बैठकी करिता पोलीस ठाणे बल्लारपुर येथील सर्व शांतता कमिटी सदस्य हजर होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक सा. यांनी पोलीस पाटील यांचीही बैठक घेवुन त्यांना मार्गदर्शन केले.

मा. पोलीस अधिक्षक सा. यांनी रस्ता सुरक्षा, नविन कायदे यातील बदल, महिला व बालकाविरुध्द सुरक्षा तसेच गुन्हयाबाबत, सायबर जागृती बाबत माहिती देवुन मार्गदर्शन केले.

तसेच पोलीस ठाणे बल्लारपुर येथे भेट देवुन पोलीस ठाणे परिसर स्वच्छ ठेवणे बाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या.

चंद्रपुर पोलीस तक्रार निवारण दिनाच्या निमीत्याने पोलीस ठाणे बल्लारपुर येथे एकुण-०८ वेगवेगळ्या स्वरुपाच्या तक्रार अर्जदार आले असता त्यांचे म्हणणे ऐकुण मा. पोलीस अधिक्षक सा. यांनी स्वतः तक्रारदार यांचे तक्रारीचे निवारण केले. सर्व तक्रारदार यांनी तक्रारीचे निवारण झाल्याबाबत समाधान व्यक्त केले व जिल्हयाचे पोलीस प्रमुख हे आमच्या अडचणी बाबत जातीने लक्ष देत आहेत व स्वतः होवुन तक्रार निवारणासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे आम्हाला समाधान वाटत आहे अशा प्रतिक्रिया तक्रारदार यांनी दिल्या.   ================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ==============================             

*हॅलो चांदा न्यूज,मुख्य संपादक,शशी ठक्कर,*
*9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here