Home
Home चंद्रपूर *साप्ताहिक कलम मांगे इंसाफ चे मुख्य संपादक सय्यद रमज़ान अली महाराष्ट्र गौरव...

*साप्ताहिक कलम मांगे इंसाफ चे मुख्य संपादक सय्यद रमज़ान अली महाराष्ट्र गौरव पुरस्कारने सम्मानित*

0
70

===============================

चंद्रपूर

हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर जिल्ह्यातील नामांकित पत्रकार तथा साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांना परभणी येथील जय हिंद सेवाभावी संस्थांच्या वतीने 11 मे 2025 रोजी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम खासदार संजय जाधव, यांच्या अध्यक्षतेखाली औषधी भवन वकील कॉलनी परभणी येथे घेण्यात आला असून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 25 मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक सत्तार इनामदार, इंजिनीयर आर.डी. मगर, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, गफार मास्टर, खदिरलाला हाशमी, हाजी शरीफ सह अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते.

सय्यद रमजान अली यांना हा पुरस्कार पत्रकारितेच्या क्षेत्रात मागील अनेक दशकापासून उल्लेखनीय व सक्रियरिता कार्य करीत असल्याने तसेच जनतेचे प्रश्न शासन दरबारी आपल्या लेखणीच्या माध्यमातून लावून धरत असल्याने त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणूनच हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे मनोगत याप्रसंगी आयोजक मान्यवरांनी व्यक्त केले.  त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांनी व सामाजिक संघटनेनी शुभेच्छा देत अली यांचे अभिनंदन केले आहे, हे मात्र विशेष!

या कार्यक्रमाचे संचालन मुकुंद नंद व आभार प्रदर्शन शफिक चारठाणकर यांनी केले. ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==============================                 *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here