Home
Home चंद्रपूर जिवती येथे भाजपचा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न.आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात इनकमिंगची...

जिवती येथे भाजपचा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न.आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात इनकमिंगची रांग..

0
147

================================

पाच नगरसेवकांसह दोनशे कार्यकर्ते भाजपात; शरद पवार गटासह कॉंग्रेसला खिंडार 

                           जिवती   

                    हॅलो चांदा न्युज

जिवती,(का प्र) :-  भारतीय जनता पार्टी जिवती तालुक्याच्या वतीने काल दि. २३ मे रोजी जिवती शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गट आणि कॉंग्रेसच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनीसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जिवती तालुक्यातील नागरिक आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार देवराव भोंगळे यांनी सर्व नवप्रवेशितांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचे भाजप परीवारात स्वागत केले आणि सर्व नवप्रवेशितांच्या प्रवेशाने पहाडावर पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलतांना ते म्हणाले, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आज विविध पक्षांचे नविन कार्यकर्ते आमच्या सोबत आमच्या परीवारात येत आहेत याचा विशेष आनंद आहे. येत्या काळात या सर्वांच्या सहकार्याने जिवती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासबरोबरच जनता-जनार्दनाची सेवा आणि जिवतीच्या बहुप्रलंबीत समस्या निकाली काढण्यासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करणार आहोत.

या पक्षप्रवेश सोहळ्यात कॉंग्रेसचे विधानसभा महासचिव माजी उपनगराध्यक्ष अशपाक शेख, नगरसेवक शामराव गेडाम, नगरसेविका अहिल्या चव्हाण, नगरसेविका अनुसया राठोड, नगरसेविका लियाकतबी शेख, नगरसेविका अश्विनी गुरमे, केशव चव्हाण, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आशिष डसाने, नामदेव राठोड, वैजनाथ कदम, माजी नगरसेवक शरद चव्हाण, शिवाजी कासले, विष्णू मुसने, भानुदास येचवाड, चालक युनियनचे अध्यक्ष प्रवीण राठोड, निवास राठोड, शिवाजी पवार, प्रल्हाद राठोड, विष्णू घोगरे, मोहन जाधव, देविदास आडे, जनार्धन गेडाम, मनोहर कन्नाके, सुनील सिडाम, गोविंद आक्रुवे, सुभाष पवार, संतोष जाधव, शेषराव चव्हाण, गणपत मेश्राम, रवी चव्हाण, कौशल्य गेडाम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपच्या विचारांवर आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, जिवतीचा विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

यावेळी मंचावर भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, शहराध्यक्ष राजेश राठोड, गोविंद टोकरे, भिमराव पवार, सुनील मडावी, गोपीनाथ चव्हाण, पुरुषोत्तम भोंगळे, बापुराव मडावी, अंबादास कंचकटले, दिगांबर आंबटवाड,आनंद कदम, पुंडलिक गिरमाजी, भिमराव पवार, संतोष जाधव, पुष्पा सोयम, चेतना राठोड, सुबोध चिकटे, बालाजी माने, सांबा शिंदे, संग्राम बाजगीर, बालाजी बिरजदार, साहेबराव राठोड,राज बेल्लाळे, रामेश्वर सबुचे, टिकाराम राठोड, गोवर्धन चव्हाण,संतोष राठोड, उखंडराव चव्हाण, मोकिंद राठोड, कमलाकर जाधव,संभाजी रायवाड, बाळू ठोंबरे, रवी जेवले, कपिल राठोड, विकास सोनकांबळे, शिवाजी बोइनवाड, राहुल राठोड आदिंसह जिवतीकरांची मोठी उपस्थिती होती.    ===============================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================                 *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here