श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेच्‍या वतीने बाबुपेठ येथे भव्‍य नेत्रचिकित्‍सा शिबिर संपन्‍न

0
148

1500 नागरिकांची नेत्र तपासणी, ५१२ नागरिक चष्‍म्‍याचे लाभार्थी५२ नागरिक मोतीबिंदु शस्‍त्रक्रियेसाठी सेवाग्रामला रवाना.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नेत्र चिकित्‍सा शिबिर यशस्‍वी

रुग्‍णसेवा हीच ईश्‍वर सेवा आहे असे मानुन बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल येथे नेत्र तपासणी शिबिराचे यशस्‍वी आयोजन करण्‍यात आले. या नेत्र तपासणी शिबिराचा हजारो गरिब व गरजु नागरिकांनी लाभ घेतला.

दि. ०४ सप्‍टेंबर २०२२ रोजी गुरूदेव सेवा आश्रम हिंग्‍लाजभवानी परिसर बाबुपेठ येथे श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर द्वारा आयोजित व वने, सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नेत्रचिकीत्‍सा शिबीराचे यशस्‍वी आयोजन करण्‍यात आले. यावेळी प्रामुख्‍याने चंद्रशेखर गन्‍नुरवार, राजेश सुरावार, शैलेंद्रसिंह बैस, संदीप आगलावे, दशथ सोनकुसरे  माजी मनपा सदस्‍य प्रदिप किरमे, कल्‍पना बगुलकर, ज्‍योती गेडाम, आकाश ठुसे, बाबुराव झुरमुरे, रेखा चन्‍ने, विद्या बाथो, सिंधु राजगुरे, विजय मोगरे, राजेश यादव यांची उपस्थिती होती. डॉ. सचिन बोबडे,  डॉ. मयुर मिसाळ, डॉ. प्रतिक देशभ्रतार या नेत्र चिकीत्‍सक चमुने नेत्र तपासणीचे कार्य केले.

 या शिबिरामध्‍ये १५००  नागरिकांची नेत्र तपासणी करण्‍यात आली. त्‍यामधून ५१२ लोकांना ११ सप्‍टेंबर २०२२ रोजी चष्‍मे वितरीत करण्‍यात येणार आहे. यावेळी ५२ नागरिकांना मोतीबिंदु झाल्‍याचे निदान झाले. त्‍यामधून २५ नागरिकांना मोतीबिंदुच्‍या शस्‍त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे पाठविण्‍यात आलेअसुन उर्वरित नागरिकांना  ७ सप्‍टेंबर २०२२ रोजी नागरिकांना सेवाग्राम येथेच शस्‍त्रक्रियेसाठी पाठविण्‍यात येणार आहे. शिबिराला कस्‍तुरबा हॉस्‍पीटल सेवाग्राम येथील नेत्रतज्ञांच्‍या चमुच्‍या माध्‍यमातुन नेत्रचिकित्‍सा करण्‍यात आली. यापुर्वीही मा.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात नेत्रचिकित्‍सा शिबिरांचे आयोजन करण्‍यात आले असुन सुमारे ४० हजाराच्‍यावर नागरिकांना मोफत चष्‍मे वितरीत करण्‍यात आले असुन १६ हजाराच्‍या वर मोफत मोतीबिंदु शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या आहेत. विकासकामांचा झंझावात सुरु असतानाच सामाजिक जाणिव जपत अनेक आरोग्‍य शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्‍यात येते आहे. चंद्रपूर येथील बाबुपेठ वार्डातील नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे यावेळी आभार मानले आहे.

 

हिंग्‍लाज भवानी मंदीर गुरूदेव सेवा मंडळ बाबुपेठ येथे संपन्‍न झालेल्‍या नेत्रचिकीत्‍सा शिबीरात राजेश यादव, राजेंद्र दागमवार, सागर भगत, आकाश लक्‍काकुलवार, तेजासिंग, राजेश कोमल्‍ला, रविंद्र उमाटे, डॉ. रामटेके, मारोती पारपेल्‍लीवार, मंगेश तामगाडगे, शांताराम भोयर, अनिल शेंडे, दुमदेव मरस्‍कोल्‍हे, नितेश मल्‍लेलवार, मुकेश गाडगे, रविंद्र नंदुरकर, राजेश थुल, हर्षल मुळे, सागर भलवे, तेजस गिरी, प्रदिप निवलकर, तुषार बाला, मुस्‍तफा शेख, आर्यन अर्जुनकार, सदाशिव केमेकर, गणेश मोहुर्ले, प्रशांत इंगोले, राजू बबीलवार, मोहन यादव, रघु गुंडला, इंद्रजीत यादव, रवि साव, अमित पुल्‍लीपाका, विनोदकुमार शर्मा, रवि जाडी, नरेंद्र चिप्‍पावार, सुनिता भोयर, कांता कोरपरे, मिना पारपेल्‍लीवार, रंजना उमाटे, विमल तामगाडगे, अंकिता मुक्‍के, शालु कनोजवार, माला पवार, यांनी शिबीर यशस्‍वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here