गणेशमुर्ती विसर्जनाकरिता रामसेतु पुलाखालील जागेची भाजपा चंद्रपूर महागनरच्‍या पदाधिका-यांद्वारे पाहणी

0
33

कोरोना काळानंतर मोठया उत्‍साहात सार्वजनिक गणेशोत्‍सव साजरा करण्‍यात येत आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहावयास मिळत आहे. बाप्‍पाचे आगमन झाले आणि सर्वत्र चैतन्‍य पसरले. ‘ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा’. या श्‍लोकाचा जयघोष सर्वत्र ऐकु येते आहे. चंद्रपूर महानगरात सर्वत्र गणेशमुर्तींची स्‍थापना करण्‍यात आलेली आहे. अनंत चतुदर्शीच्‍या दिवशी गणेश विसर्जन करण्‍यात येणार आहे. हे विसर्जन निर्विघ्‍न पार पडावे याकरिता भारतीय जनता पार्टी द्वारे दाताळा येथील इरई नदीवरील ‘रामसेतु’ पुलाच्‍याखाली श्री गणेशमुर्तीचे विसर्जन करण्‍याकरिता वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.

 

गणेशोत्‍सवाची सुरूवात होण्‍याआधीपासूनच भाजपाच्‍या पदाधिका-यांद्वारे जागेची पाहणी करून विसर्जनाची तयारीवर देखरेख ठेवण्‍यात आलेली आहे. यादरम्‍यान गणेश भक्‍तांची गैरसोय होवू नये यादृष्‍टीने आवश्‍यक त्‍या सोयी सुविधा उपलब्‍ध आहे किंवा नाही याची खातरजमा करण्‍यात आली व पक्षातर्फे याठिकाणी कोणकोणत्‍या सोई उपलब्‍ध करायच्‍या आहेत याची सुध्‍दा पाहणी करण्‍यात आली आहे. यावेळी माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, माजी उपमहापौर राहूल पावडे, महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रवि गुरनुले, प्रशांत चौधरी, सविता कांबळे, अरूण तिखे, संजय निखारे, महेश राऊत, सचिन बोबडे सत्‍यम गाणार, सुमीत गौरकार, अक्षय शेंडे, अमोल मत्‍ते, सुशांत आक्‍केवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here