Home
Home चंद्रपूर पवित्र  दिक्षाभूमी चा विकास भव्य व जागतिक दर्जाचा व्हावा – आ. किशोर जोरगेवार.

पवित्र  दिक्षाभूमी चा विकास भव्य व जागतिक दर्जाचा व्हावा – आ. किशोर जोरगेवार.

0
80

=============================

दिक्षाभूमीच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक..

                                चंद्रपूर

                         हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभूमीचा जागतिक पातळीवर विकास करण्याचा संकल्प आ.किशोर जोरगेवार यांनी केला आहे. त्यांच्या प्रयत्नातून या पवित्र स्थळाच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असूनत्यातील जवळपास १४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.दिक्षाभूमीच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात बैठक बोलावली होती. सदर बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, समाजकल्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद माहुतुरेसमाज कल्यान विभागाच्या स्मिता बैहीरमवारसार्वजनिक विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवारदिक्षाभुमी ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक घोटेकरकुणाल घोटेकरराहुल घोटेकरप्राचार्य दहेगावकरनिवृत्त प्रा संजय बेलेभारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकुरभाजप नेते प्रकाश देवतळेमाजी नगर सेवक बलराम डोडाणीमनोज पालरवी गुरुनुलेरंजन ठाकूरकरणसिंह बैसकार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.किशोर जोरगेवार यांनी दिक्षाभूमीच्या विकासकामाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि सर्व प्रक्रिया जलद पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पवित्र स्थळाचा विकास नेटका व भव्य व्हावायासाठी सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा. निधीचा योग्य वापर होईल याची काळजी घ्याअसे ते यावेळी म्हणाले. दिक्षाभूमीच्या विकासासाठी मागील अनेक वर्षांपासून आपण प्रयत्नशील होतो. आता निधी मंजूर झाल्यामुळे जागतिक पातळीवर या पवित्र स्थळाचा विकास होईल. दिक्षाभूमी हे जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठीत्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणाचा विकास अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून आपण या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. या निधीतून सभागृहपथदिवेउद्यानपाणीपुरवठाशौचालय सुविधासुरक्षा यंत्रणास्थापत्यशास्त्रीय सौंदर्यवृद्धी आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे दिक्षाभूमीचा विकास भव्य स्वरूपात होणार आहे. सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा.निधीचा प्रत्येक रुपया योग्य कामासाठीच वापरला गेला पाहिजे. कोणत्याही अडथळ्यामुळे विकासकामांना विलंब होऊ देऊ नकाकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावेयासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. या पवित्र भूमीचा जागतिक दर्जाचा विकास व्हावाहा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आणि एकजुटीने काम करावेअशा सूचना यावेळी आ.किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या बैठकीत विकासकामांची रूपरेषानिधी वितरण प्रक्रियानिविदा प्रक्रिया आणि वेळापत्रक याबद्दल सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाने कामांना गती देण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. आ.किशोर जोरगेवार यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे दिक्षाभूमीच्या विकासकामांना नवा वेग मिळणार आहे. लवकरच हे पवित्र स्थान जागतिक स्तरावर नव्या स्वरूपात ओळखले जाईलअसा विश्वास आ.किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.    ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  ==============================                 *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                       *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here