चंद्रपूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात राहणारे उत्कृष्ट व्यक्तिमत्व यांचा विदर्भातील अग्रगण्य वृत्तपत्र दैनिक नवराष्ट्र द्वारे मराठी अस्मिता पुरस्कार 2022 ने गौरविण्यात आले. दरवर्षी दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्राद्वारे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात येतो. 10 सप्टेंबर ला शहरातील राधाकृष्ण सभागृहात आयोजित मराठी अस्मिता पुरस्कार कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेता अतुल परचुरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजित कार्यक्रमात तब्बल 38 मान्यवरांचा गौरव करण्यात आला. चंद्रपुरातील सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफान शेख यांचाही गौरव वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. इरफान शेख अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे, त्यांनी अनेक सामाजिक चळवळीत भाग घेत सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे. दैनिक नवराष्ट्र तर्फे त्यांचा सत्कार म्हणजे केलेल्या कामाची पावती आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय व मित्र परिवारातर्फे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793