Home
Home चंद्रपूर आगामी मोहरम,आषाढी एकादशी , गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त बैठक संपन्न.

आगामी मोहरम,आषाढी एकादशी , गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त बैठक संपन्न.

0
92

                          चंद्रपूर

                     हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर (वि.प्र.): चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशन रामनगर च्या वतीने दिनांक 25 जून रोजी आगामी मोहरम, आषाढी एकादशी , गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त बैठक संपन्न झाली.या बैठकीत रामनगर हद्दीतील सर्व मोहरम कमिटी,सह शांतता समिती सदस्य तसेच आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा उत्सव कमिटी पदाधिकारी, उपस्थित होते.आगामी दिनांक २७.०६.२०२५ पासून सुरू होत असलेला मोहरम तसेच आषाढी एकादशी , गुरुपौर्णिमा उत्सव कायदा सुव्यवस्था व जातीय सलोखा कायम रहावा या अनुषंगाने बुधवार दिनांक २५.०६.२०२५ रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

पोलीस स्टेशन रामनगर येथे उत्सव संयोजक, आयोजक व शांतता समिती यांची उत्सव आढावा सलोखा बैठक शांततेने पार पडली.

शांतता समिती सदस्य यांनी आपल्या सूचना व सुझाव या प्रसंगी सांगितले.

पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांनी सांगितले की आगामी येणारे सर्व सण आनंदाने उत्साहाने आपण सर्व मिळून साजरे करू. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा व जातीय सलोखा कायम राहावा याकरिता आपले सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे कोणतेही सण उत्सव साजरे करताना आवश्यक ती परवानगी घ्यावी असे देखील सांगितले. व वरिष्ठाकडून मिळालेल्या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे असे आवाहन देखील याप्रसंगी केले.

या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सदानंद खत्री, सय्यद रमजान अली, गुलाब पाटील, शालिनी भगत, ताजुद्दीन शेख, मुजिबुल्ला सिद्दिकी, वहिद शेख, कृष्णा कुरीले, युसुफ खान, सुभान मो. पठाण, निर्दोष देवतळे, कृष्णा गजानन कुकडकर, सतीश चौधरी, वहीद चिस्ती, मजीद खान, रशीद खान, सुरज चौधरी, आदित्य शेडमाके, शाहरुख येरमे, विशेष शाखेचे सुभाष शिडाम, दिनेश वाकडे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here