Home
Home चंद्रपूर चंद्रपूर तालुका हा कापूस उत्पादक तालुका म्हणून घोषित करा – आ. किशोर...

चंद्रपूर तालुका हा कापूस उत्पादक तालुका म्हणून घोषित करा – आ. किशोर जोरगेवार

0
109

सहकार मंत्री अतुल सावे यांची भेट घेत केली मागणी


वस्त्र उद्योग धोरण राबविण्यासाठी कापूस उत्पादक तालुका म्हणून कृषी अधिकारी यांचा अहवाल आवश्यक असल्याची अट टाकण्यात आली आहे. ही अट रद्द करुन शेती आधारित उद्योग वाढीस चालना आणि रोजगार निर्मिती करिता चंद्रपूर तालुका हा कापूस उत्पादक तालुका म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांची मुंबई येथे भेट घेउन केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी हजारो हेक्टर क्षेत्रात कापूस पिकांची लागवड करीत असून मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेत आहे. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ नुसार सहकारी तत्त्वावरील सूतगिरण्यांकरिता शासकीय भागभांडवल योजना राबविण्याकरिता राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील १८ जिल्ह्यातील ११५ तालुके कापूस उत्पादक तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक तालुके म्हणून वरोरा, भद्रावती, राजुरा व कोरपना या तालुक्यांचा समावेश आहे. त्यातच चंद्रपूर तालुक्यामध्येसुध्दा मोठ्या प्रमाणात कापुस उत्पादन होत असून येथील शेतकर्यांकडून हंगामात दररोज हजारो क्विंटल कापूस सीसीआय व पणन महासंघ कडून खरेदी केली जाते. तालुका कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्या तर्फे चंद्रपूर तालुक्यातील मागील ८ वर्षाचा कापूस लागवड व उत्पनाच्या दाखला यावरून कापूस उत्पादन सरासरी ९७२२.३८ टन आहे हे स्पष्ट होते. “वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३” च्या कापूस उत्पादक तालुका घोषित करण्याकरिता निकषानुसार किमान ९६०० टन कापूस उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यानुसार चंद्रपूर हा कापूस उत्पादक तालुका घोषित होणे आवश्यक आहे, मात्र चंद्रपूर तालुका कापुस उत्पादक तालुक्याच्या यादीतुन वगळण्यात आल्याने  सहकारी तत्त्वावर चालविण्यात येणार्या सूतगिरण्याकरिता शासकीय भागभांडवल योजने पासुन तालुका वंचित राहणार आहे. ही बाब लक्षात घेता तसेच चंद्रपूर येथे शेती आधारित उद्योग वाढीस चालना आणि रोजगार निर्मिती करिता चंद्रपूर तालुका हा “कापूस उत्पादक तालुका” म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी सहकार मंत्री अतुल सावे यांना केली आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here