Home चंद्रपूर एम ई एल प्रभागातील आंबेनाला घाटाचे सौन्दरयीकरण करण्याचे चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तन्ना निवेदन...
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(वि. प्र.) महानगरपालिका,, एम. ई. एल. प्रभाग क्रमांक ३ येथील इंदिरानगर लगत कालेशी बाबा दर्गा परिसरातील दुर्गाचौक आंबे नाला घाट या ठिकाणी दरवर्षी दुर्गा विसर्जन, गणेश विसर्जन, तसेच गौरी पूजनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडतात.
या ठिकाणी परिसरातील नागरिक, महिला मंडळे व युवक मोठ्या संख्येने सहभागी होतात. तथापि, सध्या या घाट परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा, प्रकाशयोजना, बसण्याची व्यवस्था, तसेच स्वच्छतेची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.
या घाट परिसराचे सौंदर्यीकरण झाल्यास नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक ठिकाणी विसर्जन व पूजा करता येईल. तसेच परिसरातील तरुण मंडळींना सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी एक चांगले ठिकाण उपलब्ध होईल. या भागाचे सौंदर्यीकरण केल्यास शहराच्या पर्यटन व धार्मिक महत्त्वातही भर पडेल.
म्हणूनच आपण या घाट परिसराचे सौंदर्यीकरण, सिमेंट काँक्रीट बसण्याची सोय, सोलर लाईट बसविणे, रंगकाम, फुलबाग व स्वच्छता व्यवस्थेसाठी आवश्यक ती कार्यवाही करून या ठिकाणी कायमस्वरूपी विकास काम हाती घ्यावे, अशी आमची नम्र विनंती आहे.







*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*