Home
Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा/पान मसालाच्या अवैध धंद्यावर तात्काळ नियंत्रणासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती...

चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा/पान मसालाच्या अवैध धंद्यावर तात्काळ नियंत्रणासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापनेची मागणी..!

0
138

HELLO CHANDA NEWS

           चंद्रपूर,(वि. प्र.) : जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाकू (गुटखा/पान मसाला) चा अवैध व्यवसाय उघडपणे फोफावत असून, यामुळे ओरल कॅन्सरची साथ वेगाने वाढत आहे. हा धंदा FSSAI कायदा २००६, COTPA २००३ आणि महाराष्ट्र गुटखा बंदी २०१२ चा थेट भंग करतो

                  जिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २ वर्षांत ओरल कॅन्सर रुग्णांत २५% वाढ झाली असून, यातील ६०% रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. टीनएजर्स आणि युवक गुटख्याच्या व्यसनात सर्वाधिक अडकले असून, शाळा-कॉलेज परिसर, बसस्टँडवर २० रुपयांत गुटखा सहज उपलब्ध होतो.

           १५-१९ वयोगटातील मुले ओरल कॅन्सरच्या मार्गावर आहेत.
हा अवैध धंदा अपराधी तत्त्वांनी चालवला जातो, ज्यात तस्करी, करचोरी आणि माफिया नेटवर्क सामील आहे. पोलीस व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा कारोबार गल्ली-चौराह्यावर खुलेआम चालतो. नाममात्र कारवाई फक्त चिल्लर विक्रेत्यांवर होते, तर मुख्य सप्लायर आणि माफिया मोकाट राहतात, ज्यामुळे प्रशासनावर संशय निर्माण होतो. अधिवक्ता प्रीतीशा शाह यांनी जिल्हाधिकारी श्री विनय गौडा (आयएएस) यांना निवेदना द्वारे उच्चस्तरीय चौकशी समिती तात्काळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.

                     समितीचे उद्देश: अवैध व्यवसायाचे मूळ कारण, सप्लाय चेन आणि संरक्षण देणारे घटक शोधणे. मुख्य सप्लायर, डिस्ट्रीब्यूटर, गोदाम मालक आणि तस्करी नेटवर्कचे मास्टरमाइंड यांची ओळख पटवणे. कालबद्ध अहवाल सादर करणे.
कारवाई केवळ पान ठेले किंवा छोटे विक्रेते यांच्यापुरती मर्यादित नसावी. हा धंदा थांबला नाही तर हजारो कुटुंबे उध्वस्त होतील आणि चंद्रपूरला “कॅन्सर फ्री जिल्हा” बनवण्याची संधी हातची जाईल.

        निवेदन देतांना सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफ़ान शेख अधिवक्ता प्रीतिशा शाह सचिव धीरज तामगड़े व समिति चे सदस्य उपस्थित होते..

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here