Home
Home चंद्रपूर उज्वल गौरक्षण संस्थेचे सामाजिक सेवा, धर्मप्रसार आणि संस्कार निर्मितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर जोरगेवार.

उज्वल गौरक्षण संस्थेचे सामाजिक सेवा, धर्मप्रसार आणि संस्कार निर्मितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर जोरगेवार.

0
109

गौरक्षण आणि अध्यात्माचा संगम : लोहारा येथे अन्नकूट महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.

HELLO CHANDA NEWS

                   चंद्रपूर,(का प्र.) : उज्वल गौरक्षण संस्थेने अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन करत श्रद्धाभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर मिलाफ घडवून आणला आहे. अन्नकूट महाप्रसादाचा हा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नाहीतर ती आपल्या संस्कृतीचाकरुणेचा आणि सेवाभावाचा सजीव उत्सव आहे. या संस्थेने केवळ गौरक्षा केली नाहीतर सामाजिक सेवाधर्मप्रसार आणि संस्कारनिर्मितीचे कार्य देखील आत्मभावाने केले आहे. हे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

               रविवारी उज्वल गौरक्षण संस्थाचंद्रपूर यांच्या वतीने लोहारा येथे श्रद्धाभक्ती आणि सामूहिक भावनेने अन्नकूट महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिव्य वातावरणात सतत चालणाऱ्या हरिनाम कीर्तनाने आणि भक्तीमय गजरांनी परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. समाजातील विविध स्तरांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते.

             यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारमहामंत्री मनोज पालउज्वल गौरक्षण संस्थेचे जुगलकिशोर सोमानीदीपक पारखहेमंत शाहादेशपांडेदिनेश बजाजहेमंत बुट्टनमेहुल सजदेगौरीशंकर मंत्रीसुधीर बजाजकैलास सोमानीराजेश डागा आदींची उपस्थिती होती.

      पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीगौमाता ही भारतीय संस्कृतीत मातृ स्वरूप मानले जाते. तिच्या संरक्षणातूनच पर्यावरणशेती आणि समाज यांचे संतुलन टिकते. आज येथे उपस्थित सर्व भाविकांनी ज्या भक्तिभावाने सहभाग घेतला आहेतो आपल्यातील सामाजिक एकात्मतेचा उत्तम नमुना आहे. सततचा हरिनाम कीर्तनाचा ध्यास आणि दिव्य वातावरण हे केवळ अध्यात्म नव्हेतर जीवनशुद्धीचा मार्ग आहे. अशा संस्था समाजाला दिशा देतात आणि सेवासद्भाव व संस्कार यांची मूल्ये दृढ करतात. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी देण्याचा संकल्प करावाअसे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

          गौरक्षण हे केवळ धार्मिक कर्तव्य नाहीतर ते आपल्या संस्कृतीचेसंवेदनेचे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सद्भावसंस्कार आणि सेवा यांची भावना अधिक दृढ होते. आजच्या अन्नकूट कार्यक्रमात जी एकात्मता आणि श्रद्धा दिसलीती समाजातील ऐक्याचे जिवंत उदाहरण असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here