Home
Home चंद्रपूर *जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ‘भाऊचा दांडिया’त शहरातील डॉक्टरांची उपस्थिती*

*जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ‘भाऊचा दांडिया’त शहरातील डॉक्टरांची उपस्थिती*

0
94

चंद्रपूर : गणेशोत्सवानंतर आता सर्वत्र दुर्गोत्सव सुरु आहे. नवरात्रोत्सव म्हणजे गरबा, दांडिया खेळण्याचा जणू उत्सवच. देवीची आराधना गरबा, दांडियाच्या रूपातही करीत असतो. या उत्सवात रंग भरण्यासाठी यंदा खासदार बाळू धानोरकर यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत ‘भाऊचा दांडिया’चे आयोजन करण्यात आले. यात चंद्रपूर शहरातील तरुण-तरुणी आणि महिलांनी गरब्यावर नृत्य करण्यासाठी फेर धरला. वैद्यकीय सेवेत नियमित व्यस्त असणाऱ्या डॉक्टरांनी या उत्सवात सहभागी होऊन नवरात्रोत्सवामध्ये आनंद द्विगुणित केला.

याप्रसंगी डॉ. भुक्ते, डॉ. मेहरा. डॉ. अमर पोद्दार, डॉ. शर्मिला पोद्दार, डॉ. नगिना नायडू, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. दुदीवार, डॉ. सचिन धगडी, डॉ. सैनानी, डॉ. उषा अरोरा, डॉ. देवईकर, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. भगत, डॉ. अग्रवाल, डॉ.दाभाडे, डॉ. सचिन आंबटकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते वरील डॉक्टरांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शंतनू धोटे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, माजी नगरसेवक सुनीता अग्रवाल, ओबीसी नेते उमाकांत धांडे, रेल्वे उपभोक्ता सलाहकर समिती सदस्य राज यादव, सेवादल महिला पदाधिकारी स्वाती त्रिवेदी, राधिका तिवारी – बोहरा, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते कुणाल चहारे, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, पप्पू सिद्धीकी, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, सुरज बोबडे, सिलावार यांची उपस्थिती होती.

या खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘भाऊचा दांडिया’ उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. चांदा क्लब ग्राउंडवर ५ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता दांडियाची घूम राहणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी तथा मराठा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here