=================
* भद्रावती *
13/01/2023 आम आदमी पार्टी भद्रावती च्या वतिने सुरज शाह जी यांच्या नेतृत्वाखाली व तालुका सचिव सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती येथे पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरु नगर येथील नेताजी कॉन्व्हेंटला भेट दिली. स्थानिक लोकांने दिलेल्या तक्रारी नुसार कॉन्व्हेंटची अवस्था अत्यंत वाईट आहे, भिंतींना तडे गेले आहेत, निवासी ठिकाणी हे कॉन्व्हेंट बेकायदेशीरपणे चालवले जात आहे. तिथे लहान मुलांना शिकवले जाते. भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाळेची इमारत नवीन पद्धतीने बांधावी किंवा शाळा चांगल्या ठिकाणी हलवावी, असे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणाबाबत आपचे शिष्टमंडळ तेथे पोहोचले व तेथील प्राध्यापकांशी बोलले असता त्यांना लवकरात लवकर कॉन्व्हेंट अन्य ठिकाणी हलवण्याचा इशारा देण्यात आला. त्या वेळी उपस्थीत पदाधिकारी तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर अध्यक्ष प्रफुल भाऊ शेलार, शहर उपाध्यक्ष आशिषभाऊ तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, सचिन पाटील, मंगेश भाऊ खंडाळे, केशव भाऊ पचारे, श्याम भाऊ पिंपळकर, रितेश भाऊ नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम, नितीन भाऊ देवगडे व अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.
====================
*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संपादक :- शशी ठक्कर 9881277793