====================
* न्यूज़ एडिटर निलेश ठाकरे *
====≠================
अगदी साध राहानीमान दिसायला सळ पातळ व्यक्ती महत्व म्हनजे चंद्रपुरातील “भारत रंगारी” आपल्या झाडीपट्टी येथिल गुणी कलावंता पैकी एक कलावंत. चंद्रपुरच्या या स्थानिक कलावंतानी हळु हळु का हाेईना पण नाट्य आणि सिनेक्षेत्रात एक माेठी झेप घेतली आहे. सुरवाती पासुनच भारतला अभिनयाची ओढ हाेतीच. त्यात मंचावर हाेत असलेल्या अनेक संगीतमय कार्यक्रमात मंच संचालन करून त्यांनी प्रेक्षकांना म्हनजेच कार्यक्रम बघायला येणार्या रसिकांन समाेर प्रभावी संचालन करून आपलस केल. मग मात्र त्यांनी झाडीपट्टीत नाटकाचे प्रयाेग करीत संपुर्ण झाडीपट्टीच गाजवली. सुरवातीला नाटकात भारत ला छाेट्या भुमिका कराव्या लागल्या. त्या भुमिका करित स्वताच्या अभिनयात ताे अजुन बहरतच गेला. त्या नंतर मात्र भारतनी कधी मागे वळुन बघीतलच नाही. अनेक नाटकात भारत रंगारी या कलावंतानी दमदार भुमिका सुध्दा केल्यात. त्यात भारत यांचे अभिनय काैशल्य गुण अजुन भरून निघाले. त्यामुळे नाटकात एका पेक्षा एक सरस भुमिका भारतला मिळत गेल्या. आता मात्र चंद्रपुरचा हा पठ्या झाडिपट्टीच्या नाटकात माेठ्या व मुख्य भुमिका साकारतांना दिसुन येताे. ऐवढेच नव्हे तर आता त्यांनी चक्क मराठी चित्रपटात छाेट्या भुमिका करित अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाचा डंका वाजवुन आपलेच नव्हे तर चंद्रपुर चे नाव सुध्दा चित्रपट सुर्ष्टीत पाेहचवत, भारत आपले अधिपत्य गाजवताे आहे. नाना पाटेकर सारख्या दिग्गज अभिनेत्या साेबत डॉ.प्रकाश बाबा आमटे यांचा चित्रपटात ही ताे दिसुन आला. चंद्रपुरच्याच मातीत जन्मलेल्या आपल्या पहिल्याच चित्रपटामुळे सर्वांचे लक्ष वेधणार्या दिग्दर्शक शैलेश दुपारे यांंनी एका गंभीर विषयावर ” पल्याड ” चित्रपट तयार करून भारत रंगारी यांना छाेटी का असेना पण एक महत्वपुर्ण भुमिका देवुन अभिनय करायची संधी दिली. त्या “पल्याड” चित्रपटाच्या अफाट यशानंतर भारत रंगारी यांचा अभिनय केलेला चित्रपट “रोंदळ” हा आता सिनेमा गृहात येण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपटात आपण चंद्रपुरकरांनी आवर्जुन बघावे. याही चित्रपटात आपल्या चंद्रपुरच्या भारत रंगारी यांची एक स्मरणात राहणारी छानशी भुमिका सर्वांना बघण्यास मिळणार आहे. चंद्रपुरच्या या कलावंताचा अभिनय असलेला “राैंदळ” चित्रपच आपन थेटर मध्ये जाऊन नक्की बघायला हवे. चंद्रपुरकरांना चंद्रपुर जिल्हा कलाकार असाेसिएशन च्या वतीने विनंती आहे की राैंदळ हा चित्रपट आपन स्वता बघुन आपल्या मित्र मंडळी तसेच नातेवाईकांना सुध्दा चित्रपट बघण्यास आपन सांगावे. शेवटी आपल्याच गावच हे पाेरग मराठी चित्रपटात भुमिका साकारत चंद्रपुर जिल्ह्याला ही नावलाैकिक मिळवुन देत आहे………..तर नक्की बघा मराठी चित्रपट राैंदळ ….
=====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=====================
संपादक :- शशी ठक्कर 98812777930