===================
* बैठक घेत यात्रेतील उपाययोजनेंचा घेतला आढावा… *
=======================
चैत्र महिण्यात भरणाऱ्या महाकाली यात्रेत राज्यभरासह राज्या बाहेरील भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूरात दाखल होणार आहे. त्यांची उत्तम व्यवस्था येथे झाली पाहिजे. यापुर्वीच्या अनुभवातुन बोध घेत येथील अव्यवस्थेवर तोडगा काढा, यंदाच्या यात्रेत राज्यातील विविध भागातुन येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही असे उत्तम नियोजन करा. अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहे.
=============================
येत्या 27 तारखेपासुन सुरु होत असलेल्या माता महाकालीच्या चैत्र महिण्यातील यात्रेसंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महाकाली मंदिर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले हाते. या बैठकीत सदर सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. या बैठकीला पोलीस अधीक्षक, रवींद्र परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, प्रवीण कुमार पाटील, रोशन यादव, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश राजपूत, मनपाचे सहायक आयुक्त विद्या पाटील, नरेंद्र बोबाटे, रवींद्र हजारे, रवींद्र कळंबे, प्रगती भुरे, संतोष गर्गेलवार, महाकाली देवस्थानाचे विश्वस्त सुनील महाकाले, माता महाकाली महोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष अजय जैस्वाल, सचिव ऍड विजय मोगरे, मिलिंद गंपावार, सूर्यकांत खनके, डॉ बालमुकुंद पालीवार यांच्यासह माता महाकाली भक्तांची उपस्थिती होती.
========================
दरवर्षी चैत्र महिण्यात भरत असलेली माता महाकालीची यात्रा यंदा 27 मार्च पासुन सुरु होणार आहे. या यात्रेसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान या तयारीं बाबतचा आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा घेत यात्रेकरूंच्या सोयी सुविधांच्या दिशेने आवश्यक सूचना केल्या आहे.
==========================
बागला चौकात पेंडाल टाकुन भक्तांच्या निवासाची व्यवस्था करण्यात यावी, यात्रेकरु निवासी असलेल्या ठिकाणी अतिरिक्त शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, झरपट नदी घाटावर स्नानगृह बांधण्यात यावे, विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, बैल बाजार परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, न्यु इंग्लीश शाळेच्या मैदानावर अस्थायी बसस्थानकाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, यात्रा परिसरात विद्यूत रोषणाईची व्यवस्था करावी, या परिसरात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावे, झरपट नदीवर तात्पुरत्या स्वरुपाच्या बंधाऱ्याचे निर्माण करण्यात यावे, मनपा शाळा भक्तांकरिता खुल्या करण्यात याव्यात, महापालिकेची वाहणे यात्रेकरूंच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात यावीत, पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात यावा, शांतता समितीच्या वतीने जटपूरा गेट येथे यात्रेकरुंच्या स्वागताची व्यवस्था करण्यात यावी, बैल बाजार परिसरात अस्थाई स्वरुपाची पोलिस चौकी व पोलिसांना व होम गार्ड यांना बसण्याची व्यवस्था करण्यात्र यावी, जटपुरा गेट व अंचलेश्वर गेट येथे विद्युत रोषणाई व सजावट करण्यात यावी, यात्रेकरुंना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, जटपुरा गेट व अंचलेश्वर गेट येथे मंदिरातील दर्शनाचे एलईडी स्क्रीन थेट प्रेक्षपण करण्यात यावे, या संपूर्ण यात्रे दरम्यान मदतीकरिता माता महाकाली भक्तांची समिती तयार करण्यात यावी आदी सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिका-यांना केल्या आहे. यावेळी उपस्थित माता महाकाली भक्तांनीही अनेक महत्वाच्या सुचना केल्या आहेत. यातील योग्य सुचनांची
==========================÷÷÷÷÷
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793